A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

भजनांनी पहाटेच्या काकड आरतीने होतात प्रसन्न रामदासी मठात ३५० वर्षांची परंपरा कायम विलास केजरकर भंडारा.

भजनांनी पहाटेच्या काकड आरतीने होतात प्रसन्न रामदासी मठात ३५० वर्षांची परंपरा कायम विलास केजरकर भंडारा.

प्रेस नोट
भंडारा

भजनांनी पहाटेच्या काकड आरतीने होतात प्रसन्न
रामदासी मठात ३५० वर्षांची परंपरा कायम
विलास केजरकर भंडारा.

भंडारा: ‘उठा उठा हो सकळीक वाटे स्मरावा गजमुख, उठा प्रात: काळ झाला, मारुतीला पाहु चला, उठा पांडुरंगा, दर्शन दया सकळा …अशा भक्तिमय भजनांनी पहाटेची सुरुवात होते. भल्या पहाटेस श्री समर्थ रामदासी मठातून येणारे काकड आरतीचे सूर कानी पडताच प्रसन्नता अनुभवास येते. अभंगांमधून उपदेशपर वचने कानी पडतात. कोजागिरी अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसांपासून काकड आरतीला सुरुवात होते. हिंदू धर्मात आरतीला काकड अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. याच महिन्यात दिवाळी हा धार्मिक सण येतो. याच महिन्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, गावागावांत महिनाभर पहाटे काकड आरतीचा गजर होतो.
भंडारा येथे ३५० वर्षापुर्वी श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित समर्थ रामदासी मठात दत्ता दाढी, विठ्ठल दाढी, मोहन दाढी, रामचंद्र दाढी, अमृता दाढी, प्राजक्ता दाढी, प्रणिता दाढी, आरती दाढी, वर्षा दाढी, विभावरी दाढी, श्रीमती तईकर, माटुरकर, गणेश ब्राह्मणकर, कार्तिक उरकुडे इत्यादी मंडळी हे भजन, आरती व हरिनामाचा गजर करीत भजनस्वरात दंग होतानाचे चित्र दिसत आहे.
यासह भजनी मंडळी, वारकरी काकड आरतीची पिढ्यान् पिढ्यांची परंपरा आजही तेवढ्याच उत्साहात जोपासत आहेत. काकड आरतीसाठी भाविकांची गर्दी होत असते. पहाटेस उठून स्नान करून शुचिर्भूत होऊन भाविक स्त्री व पुरुष आणि मुलेही मंदिरात एकत्र जमा होऊन भजन, आरती व हरिनामाचा भारदार आवाजात गजर करीत भजनस्वरात दंग होताना दिसत आहेत. काकड आरतीच्या सुमधुर स्वरांनी जाग येत असून सुरू असलेल्या कार्तिक मासात भक्तीचा सुगंध दरवळत आहे. रामप्रहरी काकड आरती, अभंग, पांगुळ, वासुदेव, गवळण, भूपाळीचे सूर आणि टाळ-मृदंगांचा गजर सुरू होऊन दिवस उजाडेपर्यंत ऐकायला मिळतात. ‘उठा उठा साधुसंत, साधा आपुलाले हित, गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत!’ अशा प्रकारचे विविध अभंग भजन मंडळी एक ते दीड तास भक्तिरसात तल्लीन होऊन गातात. गोड प्रसाद वितरणाने त्या दिवशीच्या काकड आरतीची सांगता होते. याप्रमाणे हा काकड आरतीचा कार्यक्रम तुळशी विवाह, कार्तिक (त्रिपुरा) पौर्णिमेपर्यंत नित्यनेमाने सुरू असतो. त्यानंतर भजन, कीर्तन दहीकाला व महाप्रसादाने काकड आरतीचा समारोप केला जातो.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
All India Media Association
Nagpur District President
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

[yop_poll id="10"]
Back to top button
error: Content is protected !!