A2Z सभी खबर सभी जिले कीTechnologyअन्य खबरेमहाराष्ट्र

अशोक पडगिलवार यांना वीर धनुर्धारी एकलव्य व समाज भूषण पुरस्कार.

संजय क. पारधी चंद्रपूर, महाराष्ट्र

चंद्रपूर : चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहामध्ये नुकताच सामाजिक क्षेत्रामध्ये अनमोल कामगिरी केल्याबद्दल त्यांना एडवोकेट अमोल बावणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र राज्य तसेच जण आक्रोश संघटना चे संस्थापक अध्यक्ष यांनी जादू कलेच्या माध्यमातून समाज संघटित करण्याकरिता जनजागृती करणे अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार करणे व समाजाच्या विकासासाठी अहोरात्र झटणे, अशा अनेक कार्याचा गौरव म्हणून त्यांना नुकताच भोई समाजाचे आराध्य दैवत वीर धनुर्धारी एकलव्य पुरस्कार मान्यवराच्या हातून देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच मानव अधिकार सहायता संघ भारत चे राष्ट्रीय प्रभारी व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवी धारणे यांचे तर्फे समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, संघाचे अशोक पडगिलवार अध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वात संघटन मजबूत, करण्याकरिता गोरगरीब जनतेला मदत करणे, जीवनावश्यक वस्तूचे किट,कपड्यांचे वाटप, मातोश्री वृद्धाश्रमामध्ये व डेबुजी सावली वृद्धाश्रमामध्ये फळे नाश्ता चे वाटप केले इत्यादी कार्यक्रमावर अभिनव उपक्रम ह्या अनमोल कार्याबद्दल त्यांना समाज भूषण पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमात योग नृत्याचे जनक भाई श्री गोपाल जी मुंदडा, जिल्हा प्रभारी सुरेश भाऊ घोडके, महिला जिल्हा प्रभारी किशोरीताई हिरुडकर, माजी नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोट्टुवार, चैतन्य नागरिक ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष अशोक संगिडवार, उपाध्यक्ष वासुदेवराव सादमवार , सचिव पुरुषोत्तम राऊत, श्री नागेश नीत सर प्रशासकीय अधिकारी,शिक्षण विभाग महानगरपालिका चंद्रपूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले, दीप प्रज्वलन व भारत मातेच्या फोटोस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. निमित्त होते प्रसिद्धी प्रमुख अशोक पडगिलवार यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त सर्वच मान्यवरांनी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरवाचा पाढा वाचला, हॅप्पी ग्रुप,भोई समाज, चैतन्य नागरी ज्येष्ठ संघ, राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल, मानव अधिकार सहायता संघ भारत व योग नृत्य परिवार मुख्यालय चंद्रपूर इत्यादी मध्ये कार्य करीत असलेल्या कार्याचा गौरव म्हणून हे दोन्ही पुरस्कार देण्यात आले व नुकताच योग नृत्य परिवाराने चंद्रपूर भूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले जादू कलाक्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात त्यांना च्याळीच्या वर पुरस्कार मिळालेले आहेत. विठ्ठल देशमुख, जगदीश जी चहांदे, दिवाकर लांडगे जितेंद्र इजगिरवार,अरुण जुनघरे, अरविंद मडावी, सतीश रेड्डी, राजू बामनोटे, संगीता जुनघरे, निशा राजपूत,राधा देवगिरकर, नागपूर अर्चना टेवरे, सीमा मडावी, नीता नागतूरे, लता लुथळे,निशा मंगर,मंदाबाई वाडके इत्यादींनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
प्रास्ताविक प्राध्यापिका अर्चना डोंगरे, उत्कृष्ट सूत्रसंचालन वैशाली बाविस्कर व आभार प्रदर्शन दिवाकर लांडगे यांनी केले. सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Back to top button
error: Content is protected !!