A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*गडचिरोलीत जय दुर्गा माता उत्सव फाउंडेशनमध्ये माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची सदिच्छा भेट व माता दुर्गा देवीचे दर्शन...*

*गडचिरोलीत जय दुर्गा माता उत्सव फाउंडेशनमध्ये माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची सदिच्छा भेट व माता दुर्गा देवीचे दर्शन...*

प्रेस नोट
गडचिरोली

*गडचिरोलीत जय दुर्गा माता उत्सव फाउंडेशनमध्ये माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची सदिच्छा भेट व माता दुर्गा देवीचे दर्शन…*

गडचिरोली (दि. २९ सप्टेंबर २०२५) :
गडचिरोली शहरातील कॅम्प एरिया येथे जय दुर्गा माता उत्सव फाउंडेशनच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भक्तिभाव आणि श्रद्धेच्या वातावरणात मंगलमय सोहळा पार पडला. अनेक वर्षांपासून भक्तांच्या श्रद्धास्थानी असलेल्या दुर्गा माता मंदिरात आज माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री माननीय डॉ. अशोकजी नेते यांनी सदिच्छा भेट देऊन दुर्गा मातेचे दर्शन घेतले.

मा.खा. डॉ. नेते यांनी या प्रसंगी माता दुर्गेची विधीपूर्वक पूजा-अर्चा करून जिल्ह्यातील जनतेच्या सुख-समृद्धी व कल्याणासाठी प्रार्थना केली. मंदिरात सुरू असलेल्या भजन मंडळातही त्यांनी भक्तांसोबत सामील होऊन भक्तिरसात नवरात्र व दुर्गोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष रमेशभाऊ चौधरी, उपाध्यक्ष नरेंद्र भोयर, सचिव अमित बंदे, कोषाध्यक्ष आनंद पारधी यांच्यासह सुरेश ताकसांडे, दिलीप गडपल्लीवार, अविनाश पाल, रजनीकांत मोटघरे, दयाकर चौधरी, नदु वायलकर, त्रिमूर्ती डोंमळे, अशोक चलाख, चिंतावार साहेब, गणेश तारक,दिवाकर गेडाम ,अतुल राचमलवार, गोविंद सावसागडे, नितेश राठोड आणि असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माता दुर्गेच्या जयघोषात आणि भक्तिमय भजनाच्या स्वरात भारावलेल्या या उत्सवी क्षणी परिसरात आध्यात्मिक उर्जा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
Vande bharat live tv news,nagpur
Editor
Indian Council of press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!