A2Z सभी खबर सभी जिले की

तायक्वांडो स्पर्धेत बागला हायस्कूलची सुवर्ण कामगिरी

विभाग स्तरावर निवड

 

:-   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपुर व डिस्ट्रिक्ट तायक्वांडो असोशिएशन, चंद्रपूर यांच्या सहयोग व सौजन्याने येथे दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकरी भवन वरोरा येथे संपन्न झालेल्या मनपा स्तरीय तायक्वांडो स्पर्धेत स्थानिक मुरलीधर बागला हायस्कूल, चंद्रपूर येथील विद्यार्थीनी सुवर्ण कामगिरी केली. एकूण ४ सुवर्ण पदक व १ रजत पदक पटकावला त्या मध्ये १४ वर्ष आतील (मुले) ३५ किग्रा मध्ये राजकुमार राकेश चौहान प्रथम क्रमांक, १४ वर्ष आतील (मुली) २९ किग्रा वजन गटात कु. मोक्षी गजेंद्रसिंह दरबार प्रथम क्रमांक, ४१ किग्रा मध्ये कु. माही प्रमोद विश्वकर्मा द्वितीय क्रमांक पटकाविला, त्याच प्रमाणे १७ वर्ष आतील (मुली) मध्ये कु. मानसी गजेन्द्रसिंग दरबार प्रथम क्रमांक, कु. श्रुति जगन दुर्गम प्रथम क्रमांक पटकाविला. व त्याच प्रमाणे समोर होणाऱ्या नागपूर विभागीय तायक्वोंडो स्पर्धेत आपली जागा पक्की केली, स्पर्धेत चंद्रपूरचा प्रतिनिधित्व करणार. या विजयी कामगिरी वर मुरलीधर बागला हायस्कूलचे प्राचार्या श्री. उमेश पंधरे सर यांनी विद्यार्थीनी खेळाडूचे कौतुक केले. तसेच शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, व सर्व कर्मचारी वर्ग यांनी खूप खुप अभिनंदन केले व समोर होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी खुप खुप शुभेच्छा दिल्या. त्याच प्रमाणे सर्व खेळांडूना NIS कुस्ती कोच श्री. मुकेश पाण्डेय सर यांचा मार्गदर्शन व शिक्षिका सौ. प्रांजली गर्गेलवर मैडम यांचा मार्गदर्शन लाभला. खेळाडूनी आपल्या विजयाचा श्रेय कोच श्री. मुकेश पाण्डेय सर व आपल्या आई वडिलांना दिले.

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!