A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

प्रा.डॉ.आदिलशाह चव्हाण यांना राज्यस्तीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

बल्हारशाह तालुक्याचे नावलौकिक

वंदे भारत लाईव्ह टिव्ही न्युज राजुरा

 

बल्लारपूर :- स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील मराठी विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.बादलशाहा डोमाजी चव्हाण यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वाड:मयीन क्षेत्रातील योगदानाबद्दल जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा 2025 या वर्षाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रविवार, दि. 30 मार्च,2025 ला विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, सिताबर्डी, नागपूर येथे महामंडळाच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे असे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. यापूर्वी त्यांच्या ‘सामाजिक अस्तित्वाचा संघर्ष’ या ग्रंथाला चंद्रपूरचा राज्यस्तरीय ‘शब्दांगण साहित्य पुरस्कार’ मिळालेला आहे. सदर ग्रंथ गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात पदव्यूत्तर मराठी अभ्यासक्रमात संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासाला आहे. डॉ. बादलशाहा चव्हाण हे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहेत. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या दखलपात्र यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. संजयभाऊ कायरकर, उपाध्यक्ष श्री. राजेशजी चिताडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रजत मंडल यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!