
संवाददाता
अमोल तौर बीड महाराष्ट्र
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरिप 2024 पीकविमा अग्रीम मंजुर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 6 लाख 59 हजार 724 शेतकरी खरिप पीकविमा अग्रीम साठी पात्र ठरले आहेत. जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी अग्रिमला मंजुरी दिली आहे.तसेच ईतर 2 लाख 44 हजार 460 शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेतून पिकविमा देण्यात येणार आहे . अग्रिम आणि विम्याची रक्कम शेतकऱ्यांना जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे.
खरिप 2024 मध्ये बीड जिल्ह्यात वेळेवर पेरणी झाली होती परंतु सप्टेंबर अणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवष्टीमुळे ऐन बहरात आलेल्या कापूस,सोयाबीन,तुर, उडीद, मूग आदी पिकांचे खुप नुकसान झाले होते . झालेल्या नुकसानीच्या 11 लाख 4 हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या होत्या. एका शेतकऱ्याची एक तक्रार ग्राह्य धरून विमा अग्रीम आणि वैकतिक लाभाच्या विम्याचा लाभ देण्याच्या अनुषंगाने विमा कंपनीने कारवाई केली आहे. त्यानुसार विम्यासाठी 6 लाख 59 हजार 724 शेतकरी पात्र झाले आहेत. मंजुरी मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी असा नियम आहे, त्यामुळे अग्रीम आणि विमा रक्कम याच महीन्यात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला जमा होणार आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा मिळणाऱ्या विमा रकमेमुळे मदत मिळणार आहे .
या शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम –
बीड तालुक्यातील -93716, अंबाजोगाई 55714, आष्टी 19443, धारूर 38732, गेवराई 153684, केज 65693, माजलगाव 65415, परळी 56614, पाटोदा 26344, शिरूर 53002 आणि वडवणी तालुक्यातील 31466 शेतकऱ्यांना खरिपातील अग्रिम मिळणार आहे. मंजुर करण्यात आलेले अग्रिम सोयाबीन, कापुस, तूर, मूग, उडिद या पिकांना लागु करण्यात आले आहे.





