

*मुंबई, नोव्हेंबर २०२५* : नेस्को मुंबई एका असाधारण परिवर्तनाच्या चळवळीची साक्षीदार ठरली आहे. महाराष्ट्राचे आघाडीचे व्यवसाय मार्गदर्शक आणि उद्यमी महाराष्ट्र उपक्रमाचे संस्थापक डॉ. ओमकार हरी माळी यांनी केवळ मराठी समुदायासाठी आयोजित केलेला ट्रेन द एक्झिम्प्रेनर या ऐतिहासिक दहाव्या उपक्रमात तब्बल दोन हजारांहून अधिक उदयोन्मुख मराठी उद्योजक सहभागी झाले होते. केवळ मराठी उद्योजकांसाठी आणि आयात-निर्यातीच्या क्षेत्राबाबत सखोल ज्ञान प्रदान करणारा भारतातील हा सर्वात मोठा शैक्षणिक कार्यक्रम ठरला.
महाराष्ट्रातील जनतेला अधिकाधिक प्रगत आणि सक्षम बनवण्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारलेल्या या उपक्रमातून डॉ. ओमकार यांनी तीन दिवस जागतिक पातळीवरील व्यापाराबाबतती स्थिती, वास्तविक जगातात असलेली उद्योजकता, मानसिकतेत परिवर्तन घडविणे आणि आध्यात्मिक समतोल या घटकांचा मिलाफ घडवत उपस्थितांना ज्ञानसंपन्न बनविले. विशेषतः मराठी भाषिक उदयोन्मुख उद्योजकांसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
विकास घडविणारे ३ दिवस: पाया → शोध → परिवर्तन
• पहिला दिवस — पायाभरणी दिन: आयात-निर्यातीबाबतची ब्लूप्रिंट
पहिल्या दिवशी निर्यात-आयात उद्योगात प्रवेश करु इच्छिणाऱ्या उपस्थितांसाठी संपूर्ण पाया रचला गेला. डॉ. ओमकार यांनी उत्पादनाचे पॅकेजिंग, मार्किंग, लेबलिंग आणि विविध देशांच्या बाजारांच्या शैलीचा अभ्यास करत उपलब्ध बाजारपेठेचा आकार तपासणे, स्पर्धा, नियम आणि मालवाहतूकीचे मूल्यांकन करत जगात योग्य बाजारपेठ निवडण्याचे शास्त्र समजावून सांगितले. त्यांनी बाजार संशोधनासाठी कोणत्या चौकटी वापरल्या पाहिजेत, हा मुद्दा स्पष्ट केला. तसेच एचएस कोडचा शोध घेणे, स्पर्धकांचे विश्लेषण करणे, किंमत जाणून घेणे आणि खरेदीदारांची ओळख यासाठी एआय साधनांचा वापर कसा करायचा याबाबत थेट प्रात्यक्षिके सादर केली. विशेषतः पहिल्या पिढीतील मराठी उद्योजकांना नजरेसमोर ठेवत त्यांनी ही प्रात्यक्षिके तयार केलेली होती.
निर्यात किंमत मॉडेल तयार करणे, पुरवठादार पडताळणी पद्धती, व्यवसाय नोंदणी आणि ड्रॉप-शिपिंग मार्ग तसेच विविध उत्पादन श्रेणींसाठी किती प्रमाणात गुंतवणूकीची गरज असते, हे मुद्दे सहभागींनी जाणून घेतले. दिवसाचा शेवट अतिशय प्रेरणादायी क्षणाने झाला आणि तो म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनातून एकत्रितपणे १०३ कोटी रुपये कमावणाऱ्या ११० मराठी यशस्वी व्यक्तींना यावेळी सन्मानित करण्यात आले.
• दुसरा दिवस – शोध घेण्याची प्रक्रिया
दुसऱ्या दिवशी उपस्थितांना जागतिक खरेदीदार, त्यांचे वर्तन, प्राधान्ये आणि निर्णय कशा पध्दतीने घ्यायचे हे मुद्दे स्पष्ट करण्यात आले. डॉ. ओमकार यांनी खरेदीदारांचे मानसशास्त्र, त्यांच्याकडे कशा पघ्दतीने लक्ष ठेवणे, संवाद आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत आपला प्रभाव कसा निर्माण करणे हे मुद्दे स्पष्ट केले. यावेळी उपस्थित जीएसटी आणि लॉजिस्टिक्स तज्ञांनी विविध नियमांचे अनुपालन, दस्तऐवजीकरण आणि मालवाहतूक कशा पध्दतीने करायची, याबाबत माहिती दिली. प्रथमच निर्यात विश्वात पाऊल ठेवलेल्या मराठी उद्योजकांसाठी ही जटील प्रक्रिया सोप्या पध्दतीले उलगडली गेली.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पैशाच्या विनियोगाचा परिवर्तनकारी प्रात्यक्षिक हे राहिले. या प्रात्यक्षिकांत सहभागींनी पैशाबद्दल असलेली भीती, भूतकाळातील आर्थिक आघात आणि त्यामुळे विश्वासाला गेलेला तडा यावर मात कशी करायची, हे जाणून घेतले. डॉ. ओमकार यांनी दिलेला पुढील संदेश उपस्थितांच्या मनात अतिशय खोलवर रुजले:
“विपुलता मिळविण्यासाठी, तुम्हाला वाढण्यापासून रोखणाऱ्या भितीला मूठमाती दिली पाहिजे.”
अनेक सहभागींनी तत्काळ निर्माण झालेल्या यशरुपी यशाबद्दल सांगितले – ज्यात एका व्यक्तीने आपले अनुभव सांगितले आणि ते असे होते की, “माझी जमीन अडकली होती आणि आज संध्याकाळी वाद मिटणार, हे मी स्वतः ऐकले.”
• तिसरा दिवस-परिवर्तनाचा अनुभव
तिसऱ्या दिवशी रणनीती, प्रेरणा आणि भावनिक प्रगती या मुद्दांआधारे शक्तिशाली प्रवासाकडे वाटचाल करण्यात आली. डॉ. ओमकार यांनी यशस्वी मराठी उद्योजकांना त्यांच्या प्रामाणिक प्रवासातील संघर्ष, अपयश, यश आणि यशोगाथा सादर करण्यासाठी मंचावर आमंत्रित केले. त्यामुळे उपस्थितांना त्यांच्याबरोबरच्या व्यक्तींचे खरेखुरे आणि वास्तविक उदाहरणे मिळाली.
मराठी उद्योजकांच्या मदतीसाठी आपण वैयक्तिकरित्या उपलब्ध आहोत, त्यांच्या कॉल्सना उत्तर देतो, निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करतो आणि त्यांच्या व्यवसाय प्रवासात सखोल सहभागसुध्दा घेतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. व्यवसायाचा श्रीगणेशा करण्यापासून ते त्यात स्थिरता मिळविणे, ऑटोमेशन वाढविणे, वाढ आणि जागतिक स्तरावर वाटचालीबाबत रूपरेषा देणारा आयात-निर्यातचा नेमका मार्गही यावेळी उपस्थितांना सादर करण्यात आला.
डॉ. ओमकार यांनी मानसिकतेबाबतच्या पद्धती, अभिव्यक्ती आणि आध्यात्मिक समतोल यांचा मिलाफ घडविताना उपस्थित मराठी बांधवांना महाराष्ट्रीय मूल्यांची कास कायम राखत जागतिक उद्योजकांसारखे विचार स्वतःमध्ये बिंबवण्यास मदत केली. कार्यक्रमाचा शेवट “जय जय महाराष्ट्र!” च्या गर्जनेने झाला. डॉ. ओमकार यांनी समारोप करताना अतिशय प्रभावी संदेश दिला आणि तो होता:
*”प्रत्येक मराठी माणूस उद्योजक बनला पाहिजे, हे माझे ध्येय नाही तर ते आपल्या सर्वांचे ध्येय आहे.”*






