

समीर वानखेड़े चंद्रपुर महाराष्ट्र: महाराष्ट्रात महाविकास आघाड़ी चे शासन आल्यानंतर जनतेसाठी पांच योजना राबविण्याची घोषणा केली आहे .त्यापैकी तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील, तेलंगणा राज्य प्रमाणे प्रत्येक कुटुंब साठी पंचवीस लाखांचा कौटुंबिक विमा लागू केला जाईल . राज्यातील महिलांना एस टी ने मोफत प्रवास ची सोय केली जाईल , प्रत्येक बांधावला दरमहा 4 हजार रुपये मिळतील , अशा आशयाचे मनोगत काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी यावेळी व्यक्त केले .
बल्लारपूर विधानसभा चे महाविकास आघाडी कडून उभे असलेले उमेदवार संतोष सिंह रावत यांची प्रचार सभा बल्लारपूर येथील वस्ती विभाग आयोजित करण्यात आली होती त्यात कन्हैय्या कुमार बोलत होते .ते पुढे म्हणाले की 2024 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लक्षभेदी ठरणार असून या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले असून महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे मॉडेल आहे.
व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यापेक्षा अमूर्त वस्तूंना उध्वस्त करून पुनर निर्माण करणे म्हणजे महा विकास होय का असं असा प्रतिप्रश्न ही विचारला आम्ही धर्माला जरी तुझ्यात असलो तरी लोकशाही व संविधान या समता स्वातंत्र्य बंधुता या तत्त्वांचही पालन करतो म्हणून आपण सर्व मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणून पुरोगामी विचारांना बळकट करण्याचा आव्हान सुद्धा का नाही कन्हैया कुमार यांनी केले.
या प्रचार सभेला या प्रचार सभेला महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंग रावत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी सूर्यप्रभा चटियार ,माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, शिवसेना (उबाठा )जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, घनश्याम मूलचंदानी आणि प्रदीप गेडाम, पवन भगत रिपब्लिकन नेते अशोक निमगडे आदींनी संबोधित केले यावेळी मंचावर एडवोकेट बाबासाहेब वासाडे , शहर काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल करीम, बादल उराडे ,डॉक्टर सुनील कुलदीवर राजेंद्र वैद्य दिलीप माकोडे भास्कर माकोडे एडवोकेट मेघा भाले अफसाना सय्यद आदींची उपस्थिती होती सभेचे संचालन देवेंद्र आर्य यांनी केले. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ता तथा जनतेची उपस्थिती होती.







