A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

मोहटादेवी विश्वस्तांची मार्गदर्शन बैठक;भाविकांच्या सुविधांसह विकास आराखड्याला गती...

मोहटादेवी विश्वस्तांची मार्गदर्शन बैठक;भाविकांच्या सुविधांसह विकास आराखड्याला गती...

प्रेस विज्ञप्ति
मोहटादेवी देवस्थान,पाथर्डी
अहिल्यानगर

मोहटादेवी विश्वस्तांची मार्गदर्शन बैठक;भाविकांच्या सुविधांसह विकास आराखड्याला गती…

पाथर्डी (शिवप्रहार न्यूज) याबाबत अधिक माहिती अशी की, मोहटादेवी देवस्थानच्या विश्वस्त मंडळातील दहा (१०) विश्वस्तांची नियुक्ती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नगर यांच्या आदेशाद्वारे नुकतीच करण्यात आली. नवनियुक्त विश्वस्तांच्या प्रथम परिचय बैठकीत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांनी देवस्थानच्या आगामी विकास दिशा, भाविकांना सोयी–सुविधा उपलब्ध करणे व मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

बैठकीत सर्वानुमते मंजूर ठरावातील प्रमुख निर्णय:

भाविक, मोहटे ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करणेकरिता रुग्णालय उभारणे बाबत नियोजन करणे, बाह्य रुग्णसेवा तातडीने सुरू करणे,देवस्थानची विविध माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी करून भाविकांशी माहितीपूर्ण संपर्क वाढविणे,भाविकांच्या मार्फत उत्सवमूर्तीवर अभिषेक सेवा पुनः सुरू करणे,भाविकांसाठी विविध धार्मिक पूजा व्यवस्था सुरु करणे,मोहटे ग्रामस्थांकरिता वार्षिक उत्सव ग्रामस्थांच्या सहभागाने आयोजित करण्याबाबत योजना तयार करणे,देवीच्या सुलभ दर्शनासाठी आधुनिक व शिस्तबद्ध व्यवस्था उभारणे,महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचे समन्वयाने मंदिर परिसराचा विकास करून भाविकांना विविध सुविधा पुरविणे,देवस्थानच्या उन्नतीसाठी संकल्पित कार्ययोजना तयार करून अंमलबजावणीची सुरुवात करणे.
नवनियुक्त विश्वस्तांनी पदसिद्ध विश्वस्त यांचे तसेच न्यासाचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश महेश लोणे यांच्या कुशल नेतृत्वाखाली देवस्थानाच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची व भाविकांच्या सहकार्याने मंदिराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाला प्रतिष्ठा मिळवून देण्याची बांधिलकी व्यक्त केली.
यावेळी विश्वस्त बाबासाहेब दहिफळे, शशिकांत दहिफळे, शुभम दहिफळे, अशोक दहिफळे, राजेंद्र शिंदे, ॲड. विक्रम वाडेकर, ॲड. कल्याण बडे, ॲड. प्रसन्न दराडे, श्रीकांत लाहोटी, श्रीमती ऋतिका कराळे आदी उपस्थित होते.सुत्रसंचलन ॲड. विक्रम वाडेकर यांनी प्रास्ताविक शुभम दहिफळे यांनी केले, आभार सुरेश भणगे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यक्त केले.

RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!