
महापरिनिर्वाण दिनानिमित्त लातूर शहरात अभिवादन
लातूर: बहुजन उद्धारकर्ते, विश्वभूषण, विश्वरत्न, आधुनिक नवभारताचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात अत्यंत श्रद्धा आणि कृतज्ञतेच्या वातावरणात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समितीच्यावतीने अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महामानव बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यानंतर पु.भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण व पंचशील देऊन समाजातील नैतिकता, सामूहिक एकता आणि मानवतावादाचा संदेश दिला.
या प्रसंगी भिक्खू पय्यानंद थेरो म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक नवभारताचे निर्माते आहेत. 69 वर्षांपूर्वी त्यांचे महापरिनिर्वाण झाले आणि त्याक्षणी भारताने एक अद्वितीय प्रतिभा, तत्त्वज्ञ आणि जननायक गमावला. त्यांच्या जाण्याने वंचित, शोषित, पीडित समाज पोरका झाला. परंतु आजही त्यांचे संविधान आणि दिलेला बुद्ध धम्म ही आमची पिढ्यानपिढ्यांची शिदोरी आहे. 06 डिसेंबर हा दिवस प्रत्येकासाठी अत्यंत वेदनादायी असून, करोडो लोकांच्या मनावर आजही त्याचा खोल परिणाम जाणवतो. बाबासाहेबांचा संपूर्ण जीवनप्रवास हा केवळ एका व्यक्तीचा संघर्ष नव्हता, तर तो संपूर्ण मानवजातीच्या मुक्तीचा दिव्य संदेश होता. त्यांनी आयुष्यभर शोषित, पीडित, वंचित समाजाला आवाज दिला, स्वाभिमान दिला आणि माणूस म्हणून उभं राहण्याची ताकद दिली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाने 69 वर्षांपूर्वी देशाने एक युगप्रवर्तक विचारवंत गमावला, पण त्यांचे ध्येय, त्यांची तत्वनिष्ठा आणि मानवतावादी दृष्टी आजही अधिक तेजस्वीपणे मार्गदर्शक आहे.
कार्यक्रमा दरम्यान दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून महामानवांना सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली. “अमर रहे अमर रहे बाबासाहेब अमर रहे!” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या प्रसंगी भंते बोधिराज, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, शिक्षक आमदार विक्रम काळे, युवा नेते अजित पाटील कव्हेकर, सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार महादेव चिकटे, डी. एस. नरसिंगे, प्रोफेसर डॉ. संजय गवई, भीमराव चौदंते, अनंत लांडगे, मोहन माने, चंद्रकांत चिकटे, राहुल कांबळे, ज्योतिराम लामतुरे, केशव कांबळे, विनय जाकते, वैभव गायकवाड, डॉ. विजय अजनिकर, चिंटू गायकवाड, डी उमाकांत, निखिल गायकवाड, करण ओव्हाळ, राहुल शाक्यमुनी, सचिन गायकवाड, अॅड. रोहित सोमवंशी, डॉ. जितेंद्र वाघमारे, सिद्धांत चिकटे, मिलिंद धावारे, सुजाता अजनिकर, पंचशीला बनसोडे, विद्या ससाणे, सुनीता सोनकांबळे, निर्मला मधाळे, सुमन उडानशिव यांच्या सह समाजातील प्रतिष्ठित मान्यवर, डॉक्टर, वकील, महार बटालियनचे आजी-माजी सैनिक, कर्मचारी तसेच महाविहार धम्मसेवक ग्रुपचे सदस्य, भारतीय बौद्ध सभेचे सर्व पदाधिकारी तथा बौद्ध उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीगतर्फे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
लातूर ः 6 डिसेंबर हा विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन. या दिनाच्या औचित्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीग, लातूरतर्फे आंबेडकर पार्कवरील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला मनोभावे पुष्पहार अर्पणकरून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यासमयी ज्येष्ठ पत्रकार रामराव गवळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लीगचे अध्यक्ष अॅड. जांबुवंतराव सोनकवडे, अॅड. प्रदीप गायकवाड, उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र लातूरकर, सरकारी वकील लक्ष्मण शिंदे, कार्याध्यक्ष अॅड. शिवकुमार बनसोडे, सहसचिव अॅड. प्रशांत गायकवाड, अॅड. संजय कांबळे, अॅड. राम गजधने यांची प्रमुख उपस्थिती होती.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015







