A2Z सभी खबर सभी जिले की

राज्यात आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा मोठा विस्तार

२३९९ उपचार कॅशलेस; रुग्णालयांवर कडक नियंत्रण

सुमिता शर्मा :
राज्यात एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत महत्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. यामुळे आरोग्यव्यवस्थेतील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सेवा गुणवत्तेत मोठी होत आहे.जानेवारी २०२५ पासून उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटी मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.

उपचार पॅकेजच्या दरात वाढ करून रुग्णालयांना दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. NABH व NQAS मानक पूर्ण करणाऱ्या रुग्णालयांना १० ते १५ टक्के अतिरिक्त प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी व तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती तसेच पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

नागरिकांच्या सोयीसाठी २४ तास टोल फ्री कॉल सेंटर उपलब्ध असून, १५५३८८ / १८०००२३३२२०० व १४५५५ / १८००१११५६५ या क्रमांकांवर माहिती व तक्रारी नोंदवता येणार आहेत.योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया, तपासण्या, औषधे, इम्प्लांट्स, जेवण व एक वेळचे प्रवास भाडे पूर्णपणे मोफत व कॅशलेस देणे रुग्णालयांना बंधनकारक असून, उपचार नाकारल्यास किंवा रक्कम मागितल्यास संबंधित रुग्णालयावर दंड, निलंबन किंवा अंगीकरण रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व या योजनेस पात्र आहे, नागरिकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!