
संजय पारधी
चंद्रपूर : श्री महर्षी विद्या मंदिर , दाताळा रोड, चंद्रपूर येथे रौप्य महोत्सवी वार्षिक दिन सोहळ्याचे आयोजन अत्यंत थाटामाटात व उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. 20 व 21 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या या भव्य दोन दिवसीय कार्यक्रमाने शाळेच्या शैक्षणिक उत्कृष्टता, सांस्कृतिक समृद्धी आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या पंचवीस गौरवशाली वर्षांचा यशस्वी प्रवास साजरा केला.
पहिल्या दिवशी “ग्लॅम अँड ग्रूव्ह – फिल्मी फ्लेअर विथ ग्रूव्ही बीट्स” तर दुसऱ्या दिवशी “रस रंगिनी – द इमोशनल फ्लेवर्स*” ही मनोहारी संकल्पना सादर करण्यात आली. उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. श्री रविंद्र भागवत (नगर संघचालक, चंद्रपूर महानगर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) यांची उपस्थिती लाभली. सन्माननीय अतिथी म्हणून श्री किशोर जोरगेवार, आमदार चंद्रपूर, तसेच श्री देवऱाव भोंगळे, आमदार, राजुरा उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून डॉ. अशोक कटारे (जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर), श्री सुहास सावंत (सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर) आणि डॉ. महादेव चिंचोळे (सिव्हिल सर्जन, चंद्रपूर) यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.
दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, आमदार बल्लारपूर व माजी मंत्री (वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय) उपस्थित होते. सन्माननीय अतिथी म्हणून श्री देवऱाव भोंगळे, आमदार राजुरा, तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मिलिंद कांबळे (अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर) आणि श्री. राजीव कक्कड (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चंद्रपूर) उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, ज्यातून ज्ञान व प्रकाशाचे प्रतीक साकार झाले, त्यानंतर मंगल चरणाने कार्यक्रमास आध्यात्मिक वातावरण प्राप्त झाले. यावेळी गुरुकुल शिक्षा संस्था चे अध्यक्ष श्री. गिरीश चांडक, उपाध्यक्षा सौ. वसुधा. कंचर्लावार, सचिव ,श्री दत्तात्रय .कंचर्लावार, कोषाध्यक्ष श्री. अनुपम चिलके, सदस्य श्री. उमेश चांडक, श्री विरेंद्र जयस्वाल, सौ. अलका चांडक यांच्यासह शाळेच्या प्राचार्या सौ. श्री लक्ष्मी मूर्ती व उपप्राचार्या सौ. निशा मेहता उपस्थित होत्या.
शाळेच्या प्राचार्या श्रीलक्ष्मी मूर्ती मॅडम यांनी सादर केलेल्या वार्षिक अहवालात शाळेची सातत्यपूर्ण प्रगती, उत्कृष्ट बोर्ड निकाल, क्रीडा क्षेत्रातील यश तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यावर प्रकाश टाकला. ‘*शिक्षा, संस्कार आणि संस्कृती*’ या मूल्यांप्रती शाळेची अढळ निष्ठा विद्यार्थ्यांना आत्मविश्वासी, शिस्तबद्ध व समाजाभिमुख घडवित असल्याचे त्यांनी नमूद केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात नर्सरी ते इयत्ता अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रंगतदार नृत्याविष्कारांनी, भावस्पर्शी संकल्पनांनी व फिल्मी सादरीकरणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. रौप्य महोत्सवी सोहळा परंपरा, आधुनिकता आणि युवा ऊर्जेचा सुरेख संगम ठरला.
शैक्षणिक, सहशैक्षणिक, शिस्त व 100% उपस्थिती मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेसाठी प्रेरणा मिळाली. पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे अॅड. श्री रविंद्र भागवत यांनी शिक्षणाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करत ध्यान व योगाचा अंगीकार करण्याचा सल्ला दिला. सन्माननीय अतिथी श्री. किशोर जोरगेवार यांनी संस्थेच्या योगदानाचे कौतुक करून तिचा विस्तार अधिक विद्यार्थ्यांपर्यंत व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेने केलेल्या कार्याचे कौतुक केले. श्री. देवऱाव भोंगाळे यांनी पंचवीस यशस्वी वर्षांच्या पूर्ततेबद्दल व्यवस्थापनाचे अभिनंदन करून अशा संस्था विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरतात असे मत व्यक्त केले.
अध्यक्ष श्री गिरीश चांडक यांनी आपल्या भाषणात ‘शिक्षा, संस्कार आणि संस्कृती’ या ब्रीदवाक्याशी शाळा सदैव निष्ठावान असल्याचे सांगितले. अवघ्या 67 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज 2500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा आढावा घेत त्यांनी या यशाचे श्रेय मूल्याधिष्ठित शिक्षण, समर्पण आणि सामूहिक प्रयत्नांना दिले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन उपप्राचार्या सौ. निशा मेहता, प्रणिता बल्लेवार टीचर, सौ . पूर्वा पुराणिक टीचर तसेच विद्यार्थ्यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध नियोजन व उत्तम समन्वय दिसून आला.
रौप्य महोत्सवी वार्षिक दिन सोहळ्याचा समारोप अभिमान व कृतज्ञतेच्या भावनेने झाला. व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांमुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला आणि उपस्थितांच्या मनावर अविस्मरणीय छाप उमटवून गेला.

















