A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

समाजातील दुर्बल घटक जिल्ह्याच्या विकासाचा केंद्रबिंदू – पालकमंत्री डॉ. ऊईके

समीर वानखेडे ब्युरो चीफ:
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या नेतृत्वात राज्य सरकार शेतकरी, शेतमजूर, महिला भगिनी, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हा प्रशासन दुर्बल घटकाच्या विकासासाठी भरीव कामगिरी करीत आहे, असे गौरवोद्वार राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी काढले.

पोलिस मुख्यालय येथे 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा संदेश देतांना पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत एकूण 3 लक्ष 33 हजार (100 टक्के) शेतक-यांची फार्मर आयडी तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 1073 गावातील 8257 हेक्टर झुडपी जंगल जमीन, वन जमीन म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे 571 गावांचे डिलिस्टींगचे प्रस्ताव आणि अतिक्रमित जमिनीचे 149 गावांचे प्रस्ताव असे एकूण 720 गावनिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. यापैकी 249 प्रस्ताव वन विभागास सादर केले आहे.

‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजने’ अंतर्गत जिल्ह्यातील 209 महिलांना विविध योजनांद्वारे 100 टक्के अनुदानावर लाभ देण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाच्या आदि कर्मयोगी अभियानांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 167 गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन अंतर्गत 17 हजार 431 कोटींची गुंतवणूक आणि 14 हजार 100 रोजगार निर्मिती होण्याबाबत करार झाले आहेत. प्रधानमंत्री शहरी आवास योजनेत 3526 घरकुल तर ग्रामीण आवास योजनेत 46 हजार 381 घरकुल पूर्ण झाले आहे.
पुढे पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, चंद्रपूर पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील किडनी रॅकेट प्रकरण उघडकीस आणले व त्यातील आरोपींना देशातील विविध भागातून अटक करुन उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्ह्यात सार्वत्रिक औषधोपचार मोहीम 10 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. घरी आलेल्या आरोग्य कर्मचा-यांच्या समक्ष गोळ्यांचे सेवन करून हत्तीरोग दूरीकरण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. तत्पुर्वी मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण करून त्यांनी परेडचे संचलन केले.

उत्कृष्ठ कामगिरी करणा-यांचा सत्कार : विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणा-या अधिकारी, खेळाडू व नागरिकांचा यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेट उघटकीस आणणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचारे व त्यांचे सहकारी, उत्कृष्ठ तपासाबद्दल सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी वाकडे, व्हॉलीबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळावलिेली खेळाडू सखी दोरखंडे, दृष्टीहीन बुध्दीबळ क्रीडा स्पर्धेत प्रथम आलेला वेद नीरज पौर, राष्ट्रीय रायफल शुटींग चॅम्पियनशीपमध्ये प्रथम आलेली प्रेरणा मोरे, राज्य ऑलिंपिक संघटनेत निवड झाल्याबद्दल डॉ राकेश तिवारी यांचा समावेश होता.

Back to top button
error: Content is protected !!