
चंद्रपूर :.योग नृत्य परिवार ट्रस्ट मुख्यालय चंद्रपूरचे 8 वा वर्धापन दिन आझाद गार्डन येथे व सोबतच योग्नृत्याचे जनक भाई श्री गोपाल जी मुंदडा यांचा वाढदिवस कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला 21नोव्हेंबर 2017 ला योग नृत्याची स्थापना करण्यात आली अनेक अडचणीवर मात व संघर्ष करीत हा योग नृत्य चा वटवृक्ष वाढविला. तंदुरुस्त राहावे व रोगराई वर आळा बसविणे.सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी योग नृत्याची स्थापना करण्यात आली योग नृत्या मुळे अनेक कलावंतांना स्टेज ऊपलब्ध करून त्यांच्या कलेला वाव देण्यात आली व्यासपीठावर भाई श्री गोपाल जी मुंदडा.राधिकाजी मुंदडा या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.सर्व प्रथम मान्यवरांचे पुष्प वर्षावात सभा स्थळी आणण्यात आले.भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.दुर्गामाता मंदिर केंद्राच्या महिलांनी स्वागत गीत नृत्य तर राजीव गांधी केंद्र च्या सत्कार मूर्तीचे स्वागत सत्कार गीतद्वारे आनंदाचा जल्लोष साजरा करण्यात आला. चंद्रपूर येथील सर्वच केंद्र प्रमुख उपकेंद्र प्रमुख मंडल प्रभारी व सर्व सदस्यांनी या स्वागत समारंभात 600 च्या आसपास भाग घेऊन योग नृत्याचे जनक भाई श्री गोपाल जी मुंदडा यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्र संचालन आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक मंत्री प्रशांत katturwar तर आभार युवती प्रमुख रंजना मोडक हिने केले.नाश्ता चहा पाण्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.







