Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Ahmednagar

साहित्याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल अधुरी : प्रो. सदानंद भोसले

14 Sep 2026, 11:18 AM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
साहित्याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल अधुरी : प्रो. सदानंद भोसले - अहमदनगर, महाराष्ट्र

लोणी प्रतिनिधी (शहाजी दिघे ): कृत्रिम बुद्धिमत्ता आजच्या युगातील प्रभावी आणि स्मार्ट सहायक ठरत असली, तरी मानवी भावना, संवेदना आणि भावनिक संवादाची जागा ती घेऊ शकत नाही. न्युमरिकल डेटासोबत दर्जेदार साहित्याची सांगड घातल्याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेची साहित्यिक उपयुक्तता पूर्णत्वास जाणार नाही. त्यामुळे उच्च शिक्षण संस्थांनी दर्जेदार साहित्यनिर्मितीसोबतच त्याचे डिजिटल संवर्धन व उपलब्धतेसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख तथा हिंदी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रो. डॉ. सदानंद भोसले यांनी केले.

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ आणि महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी महोत्सव २०२६ अंतर्गत आयोजित एकदिवसीय आंतरविषयक राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बीजभाषक म्हणून बोलत होते.

प्रो. डॉ. भोसले म्हणाले, एआय हे स्मार्ट सहायक म्हणून उपयुक्त असले, तरी त्याला मानवी भावविश्वाची पूर्ण जाण नाही. एआयची साहित्यिक क्षमता विकसित करण्यासाठी समृद्ध व दर्जेदार साहित्य त्याच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी उच्च शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाचे डॉ. प्रकाश कोपार्डे यांनी आंतरविषयक शिक्षणातील एआयच्या सकारात्मक व नकारात्मक पैलूंवर भाष्य केले. डॉ. दीपक तुपे, प्रो. डॉ. साताप्पा चव्हाण, प्रो. सचिन कदम, प्रो. डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. संदीप तपासे व प्रा. नीलेश जाधव यांनी विविध सत्रांत मार्गदर्शन केले.

समारोपप्रसंगी प्रो. डॉ. साताप्पा चव्हाण यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या पार्श्वभूमीवर अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांना नव्या दृष्टिकोनातून विचार करण्याची संधी मिळत असल्याचे सांगितले. कार्यशाळेत महाराष्ट्रासह कर्नाटक, उत्तर प्रदेश, हैदराबाद, केरळ व मध्य प्रदेशातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांनी स्वागत केले. डॉ. भाऊसाहेब नवले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रो. डॉ. रामदास बोरसे, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, डॉ. दिनकर घाणे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रो. डॉ. अनंत केदारे यांनी मानले.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

गौर थाना समाधान दिवस में उमड़ी फरियादियों की भीड़, SDM उमाकांत तिवारी ने त्वरित निस्तारण के दिए कड़े निर्देश
Basti14 Sep

गौर थाना समाधान दिवस में उमड़ी फरियादियों की भीड़, SDM उमाकांत तिवारी ने त्वरित निस्तारण के दिए कड़े निर्देश

थाना गौर परिसर में शनिवार को थाना समाधान दिवस का आयोजन किया गया, जहां अपनी समस्याएं लेकर पहुंचे…

पूरी खबर पढ़ें →
राष्ट्रीय मानव अधिकार आयोग के सदस्य प्रियांक कानूनगो का सागर आगमन
Sagar14 Sep

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग के सदस्य प्रियांक कानूनगो का सागर आगमन

सागर।वंदे भारत लाइव टीवी न्यूज रिपोर्टर सुशील द्विवेदी 8225072664 * राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (NHRC), नई दिल्ली के…

पूरी खबर पढ़ें →
थाना लवकुश नगर पुलिस की बड़ी कार्यवाही वर्क फ्रॉम होम के नाम पर 12 लाख से अधिक की ऑनलाइन फ्रॉड में 2 आरोपी गिरफ्तार
Chhatarpur14 Sep

थाना लवकुश नगर पुलिस की बड़ी कार्यवाही वर्क फ्रॉम होम के नाम पर 12 लाख से अधिक की ऑनलाइन फ्रॉड में 2 आरोपी गिरफ्तार

लवकुशनगर/छतरपुर थाना लवकुशनगर पुलिस की बड़ी कार्यवाही वर्क फ्रॉम होम के नाम पर 12 लाख रुपये से अधिक…

पूरी खबर पढ़ें →
उसाचे उत्पादन वाढवा, पाण्याची जबाबदारी माझी : ना. राधाकृष्ण विखे पाटील
Ahmednagar14 Sep

उसाचे उत्पादन वाढवा, पाण्याची जबाबदारी माझी : ना. राधाकृष्ण विखे पाटील

सोनगाव ,प्रतिनिधी (शहाजी दिघे ) : सहकारी साखर कारखानदारीचे अर्थकारण भक्कम करण्यासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र आणि एकरी…

पूरी खबर पढ़ें →
अहिल्यानगरच्या औद्योगिक क्रांतीत प्रवरा बँकेने उतरावे : ना. राधाकृष्ण विखे पाटील
Ahmednagar14 Sep

अहिल्यानगरच्या औद्योगिक क्रांतीत प्रवरा बँकेने उतरावे : ना. राधाकृष्ण विखे पाटील

१ हजार कोटींच्या ठेवी; १,८०० कोटींचा व्यवसाय | सलग तिसऱ्या वर्षी शून्य टक्के एनपीए; सभासदांना १० टक्के लाभांश…

पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Satna14 Sep

*ब्रेकिंग न्यूज़: बिरसिंहपुर गैस एजेंसी पर उमड़ी उपभोक्ताओं की भारी भीड़*

बिरसिंहपुर (मध्य प्रदेश):तहसील मुख्यालय बिरसिंहपुर स्थित गैस एजेंसी पर आज सुबह से ही रसोई गैस के लिए उपभोक्ताओं…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!