Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Ahmednagar

गांधी-शास्त्री विचारांचा जागर; विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

02 Oct 2026, 09:33 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
गांधी-शास्त्री विचारांचा जागर; विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ - अहमदनगर, महाराष्ट्र

लोणी (वार्ताहर) : रयत शिक्षण संस्थेच्या प्रवरा परिसरातील महात्मा गांधी संकुलात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी संकुलाचे प्राचार्य दिलीप डहाळे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, पर्यवेक्षिका संगीता सांगळे तसेच शिक्षकांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संगीता उगले यांनी केले. यावेळी डॉ. शरद दुधाट व प्राचार्य दिलीप डहाळे यांनी मनोगत व्यक्त केले. महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा व स्वच्छतेच्या विचारांसह लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श विद्यार्थ्यांनी जीवनात अंगीकारावा, असे आवाहन करण्यात आले.

प्राचार्य दिलीप डहाळे यांनी आपल्या मनोगतात दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमास प्र. उपप्राचार्य संजय डुबे, शिवाजी काळे, संजय ठाकरे, देवेश आहेर, माधुरी वडघुले, रविंद्र मेढे, विलास गभाले, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. सूत्रसंचालन संगीता उगले यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी नरेंद्र ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर तिन्ही विभागांतील विद्यार्थ्यांनी मैदान व विद्यालय परिसरात श्रमदान करून स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. स्वच्छता, जलसंवर्धन आणि राष्ट्रसेवेची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

शादीशुदा मामा ने भांजी से की शादीः युवती 19 साल तो युवक 30 का, मंदिर में रचाया ब्याह, कई साल से था प्यार
Amroha02 Oct

शादीशुदा मामा ने भांजी से की शादीः युवती 19 साल तो युवक 30 का, मंदिर में रचाया ब्याह, कई साल से था प्यार

अमरोहा के डिडौली कोतवाली क्षेत्र में 30 वर्षीय शादीशुदा मामा ने 19 वर्षीय भांजी से मंदिर में शादी…

पूरी खबर पढ़ें →
गांधी जयंती पर न्यायालय परिसर में गूंजा श्रमदान का संदेश प्रधान जिला न्यायाधीश श्री थॉमस एक्का, न्यायाधीशों, अधिवक्ताओं और न्यायिक कर्मचारियों ने थामा स्वच्छता का संकल्प
ग्राम सोहलपुर में विशेष जागरूकता कार्यक्रम आयोजित, जनता को नए आपराधिक कानूनों को लेकर किया गया जागरूक।
Haridwar02 Oct

ग्राम सोहलपुर में विशेष जागरूकता कार्यक्रम आयोजित, जनता को नए आपराधिक कानूनों को लेकर किया गया जागरूक।

फुरकान अंसारी। हरिद्वार। वरिष्ठ अधिकारियों के निर्देशानुसार आज कोतवाली कलियर पुलिस टीम द्वारा ग्राम सोहलपुर में एक विशेष…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!