*वन्यजीव सप्ताह २०२६ ला शुभारंभ*

*वन्यजीव सप्ताह २०२६ ला शुभारंभ*
विलास केजरकर भंडारा
भंडारा:- ‘वन्यजीव सप्ताह -२०२६’ अंतर्गत "Save Ecosystem And Tiger (SEAT)" आणि "भंडारा वन विभाग" यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या दिवशी दोन जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
*अड्याळ वनपरिक्षेत्र – माडगी राऊंड*
स्व. एन. पी. डब्ल्यु. सैनिक विद्यालय, लाखनी येथील विद्यार्थ्यांसाठी माडगी राऊंडच्या जंगल परिसरात निसर्ग भ्रमण व वन्यजीव जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. “वन्यजीव व त्यांच्या अधिवासाचे संरक्षण” या विषयावर विद्यार्थ्यांना वन्यजीव संवर्धन, अधिवास संरक्षण, जैवविविधता, मानव-वन्यजीव सहअस्तित्व आणि नागरिकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जंगल परिसराचे निरीक्षण करण्यासोबतच तळ्याजवळील कचरा साफ करून स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाला मानद वन्यजीव रक्षक श्री. शाहिद खान, अड्याळचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. योगेश शर्मा, अड्याळ वनपरिक्षेत्रचे क्षेत्र सहाय्यक श्री. विजय राऊत, वनरक्षक श्री कृष्णा सानप, मनीष मेश्राम, कु. वर्षा कोहळे, वैशाली नान्हे, व PRT सदस्य तसेच स्व. एन. पी. डब्ल्यु. सैनिक विद्यालयाचे शिक्षक श्री. नितेश पुरी, तिलक हलमारे व इतर शिक्षक उपस्थित होते. तसेच SEAT सदस्य नाहीद परवेज, समीर खान, शुभम थोटे, निलेश रंगारी, प्रियांशु घोडेस्वार व स्वयंसेवक उपस्थित होते.
*तुमसर वनपरिक्षेत्र – चांदपूर*
आडकुजी चौधरी आदिवासी आश्रम शाळा, चांदपूर येथे विद्यार्थ्यांसाठी “वन्यजीव व त्यांच्या अधिवासाचे संरक्षण” या विषयावर जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले. SEAT सदस्य श्री. दिनेश देशमुख यांनी वन्यजीवांचे भ्रमण मार्ग, मानव-वन्यजीव संघर्ष शमन तसेच विविध वन्यजीव व त्यांच्या जीवनचक्राबाबत माहिती दिली. तुमसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सी. जी. रहांगडाले यांनी स्थानिक परिसंस्थेत पक्षी, झाडे व कीटकांचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाला तुमसर वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच SEAT सदस्य नितांत मोहतुरे, नंदलाल ढबाले आणि इतर सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यक्रम *“Connecting Corridors, Thriving Wildlife” (जोडलेले अधिवास मार्ग, समृद्ध वन्यजीवन)* या वन्यजीव सप्ताह २०२६ च्या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आले.
**All India Media Association*
Nagpur reporter*
*District President*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
*Devashish Govind Tokekar*
*My Youtube Channel*
@devashishtokekar1369
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।







