Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Ahmednagar

लोणीत राष्ट्रीय वैद्यकीय क्रीडा स्पर्धांचा जल्लोष

03 Oct 2026, 09:10 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
लोणीत राष्ट्रीय वैद्यकीय क्रीडा स्पर्धांचा जल्लोष - अहमदनगर, महाराष्ट्र

३५ संघांतील ४०० खेळाडूंचा सहभाग; संघभावना, संयम अन् परिश्रमातून यश निश्चित : भिमराज दराडे

लोणी, प्रतिनिधी शहाजी दिघे : खेळ हा केवळ शारीरिक तंदुरुस्तीचा विषय नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. खेळातून संघभावना, संयम, शिस्त आणि परिश्रमाची वृत्ती विकसित होते. डॉक्टरांनी स्वतःचे आरोग्य जपले, तरच ते समाजाच्या आरोग्याची प्रभावीपणे सेवा करू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये जिंकण्यापेक्षा संघभावनेने खेळण्याला आणि सातत्यपूर्ण परिश्रमाला महत्त्व द्यावे. या गुणांच्या बळावर यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी केले.
प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लोणी या प्रवरा अभिमत विद्यापीठात राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय महाविद्यालयांच्या क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी दराडे बोलत होते.
यावेळी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे विश्वस्त ध्रुव विखे पाटील, कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे, अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन, कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे, क्रीडा संचालक डॉ. सुनील बुलार, क्रीडा शिक्षक नितीन गोर्डे आदी उपस्थित होते.
दराडे यांनी प्रवरा परिसराच्या विकासाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून सहकाराच्या माध्यमातून परिसराचा कायापालट झाला. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात प्रवरा परिसराने भरीव योगदान दिले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या प्रयत्नातून आरोग्यसेवेचे सक्षम केंद्र विकसित झाल्याचे त्यांनी नमूद केले.
यानंतर दराडे यांनी क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाची घोषणा केली. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धांसाठी विविध वैद्यकीय महाविद्यालयांचे ३५ संघ दाखल झाले असून सुमारे ४०० खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामुळे लोणी परिसरात क्रीडा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिपेश खाबीया यांनी सूत्रसंचालन केले, तर रीया छल्लानी यांनी आभार मानले.

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

विकास के साथ सांस्कृतिक विरासत का संरक्षण भी आवश्यक – मुख्यमंत्री शर्मा
Jodhpur18 Oct

विकास के साथ सांस्कृतिक विरासत का संरक्षण भी आवश्यक – मुख्यमंत्री शर्मा

जोधपुर : मुख्यमंत्री भजनलाल शर्मा ने कहा कि भारतीय संस्कृति कर्तव्यों पर आधारित रही है और इन्हीं कर्तव्यों…

पूरी खबर पढ़ें →
*अयोध्या में नवरात्रि की धूम दर्शन के लिए उमड़े लाखों श्रद्धालु, ड्यूटी पर तैनात पुलिसकर्मियों का हुआ सम्मान*
Ayodhya18 Oct

*अयोध्या में नवरात्रि की धूम दर्शन के लिए उमड़े लाखों श्रद्धालु, ड्यूटी पर तैनात पुलिसकर्मियों का हुआ सम्मान*

*ब्रेकिंग न्यूज़ अयोध्या* *अनूप कुमार रिपोर्टर अयोध्या* *अयोध्या* पावन नवरात्रि के अवसर पर धर्मनगरी अयोध्या में भक्ति का…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!