Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Bhandara

आता विद्यार्थ्यांना ताजा, सकस आहार वेळेत मिळणार ! शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्त धोरण आखावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

06 Oct 2026, 11:08 AM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
आता विद्यार्थ्यांना ताजा, सकस आहार वेळेत मिळणार ! शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्त धोरण आखावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - भंडारा, महाराष्ट्र

आता विद्यार्थ्यांना ताजा, सकस आहार वेळेत मिळणार !
शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्त धोरण आखावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विलास केजरकर भंडारा.

मुंबई, दि. ५ – प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ताजा, सकस आणि दर्जेदार आहार वेळेत मिळण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हास्तरावर द्यावेत. यासाठी शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्त धोरण आखून आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत. तसेच सध्या आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. त्याऐवजी दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ देण्याबाबतची व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची आढावा बैठक झाली. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक अभिषेक कृष्णा, एकात्मिक बाल विकास कार्यक्रम आयुक्त माधवी सरदेशमुख आणि इस्कॉनचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. तर सर्व महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आहाराचा दर्जा राखण्यासाठी शहरी भागाबरोबरच ज्या ग्रामीण भागांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृहाचा पर्याय व्यवहार्य ठरेल अशा ठिकाणी तो पर्याय स्वीकारावा. दुर्गम आणि आदिवासी भागातील शाळांपर्यंत केंद्रीय स्वयंपाकगृहातून अन्न पोहोचण्यास उशीर लागत असल्याने तेथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इतर पर्याय स्वीकारावेत. केंद्रीय स्वयंपाकगृहाचा पर्याय राबविताना शाळांपर्यंत वेळेत आणि ताजा पोषण आहार पोहोचू शकतो का, याची स्थानिक स्तरावर तपासणी करावी. शक्य तेथे आहार वितरणाची जबाबदारी स्थानिक बचतगटांना द्यावी. संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी स्थानिक गरजा व व्यवहार्यता लक्षात घेऊन याबाबत निर्णय घ्यावा. आहाराची गुणवत्ता, सेवा आणि देयक व्यवस्थेबाबत स्पष्ट निकष निश्चित करावेत.
शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाने जिल्हास्तरावर मागणीचे मूल्यांकन करून दोन्ही विभागांच्या उपलब्ध साधनसामग्रीचा समन्वयाने वापर केल्यास योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविता येईल. त्यासाठी आवश्यक प्रशासकीय लवचिकता आणि अधिकार क्षेत्रीय स्तरावर देण्याबाबत विभागांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. संयुक्त धोरण तयार करण्यापूर्वी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचना विचारात घेऊन स्थानिक अडचणी व आवश्यक बदल जाणून घ्यावेत. त्यानुसार व्यवहार्य सूचनांचा धोरणात समावेश करुन मंत्रिमंडळासमोर संयुक्त प्रस्ताव सादर करावा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय पोषण आहार समितीची बैठक घेऊन त्या-त्या भागात उपलब्ध असलेल्या प्रथिन समृद्ध खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करण्याचे नियोजन करावे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेत समन्वय साधावा. स्थानिक आहारपद्धती आणि विद्यार्थ्यांची पसंती लक्षात घेऊन मिलेटयुक्त पदार्थांसह पोषणमूल्य असलेल्या पर्यायांचा विचार करावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय स्वयंपाकगृहाची व्याप्ती वाढवावी तसेच ग्राम पंचायतींना निधी देऊन स्थानिक पातळीवर पोषण आहार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी द्यावी, अशी सूचना केली. तांदळाचे प्रमाण कमी करुन त्याऐवजी इतर धान्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्याची विनंती त्यांनी केली. शालेय विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येत असून यापुढे पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विभागाच्या माध्यमातून शहरी भागात ३० अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पुरविण्याचे काम ‘इस्कॉन’ कडे देण्यात येत असल्याचे सांगितले. याची परिणामकता तपासून अंगणवाड्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील आहार समितीला स्थानिक परिस्थिती तसेच उपलब्धता विचारात घेऊन पोषण आहार पुरविण्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार द्यावेत, प्री मिक्स अथवा फो‍र्टिफाईड पदार्थांऐवजी स्थानिक गरजांनुसार सुटे पदार्थ देऊन ताजा आहार द्यावा.पोषण आहारामध्ये मैदा वापरण्यात येऊ नये. अशी सूचना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केली आहे.
शालेय शिक्षण विभागाचे आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, महिला व बालविकास विभाग, एकात्मिक बाल विकास कार्यक्रम आयुक्त माधवी सरदेशमुख यांनी तर अन्नामृत फाऊंडेशनच्या केंद्रीय स्वयंपाक गृहासंदर्भात इस्कॉनच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले.
शालेय शिक्षण विभागामार्फत राज्य व केंद्र शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित ८५ हजार २०६ पात्र शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देण्यात येतो. केंद्र शासनाच्या निकषांनुसार इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनयुक्त, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनयुक्त दुपारचे भोजन देण्यात येते. आहारात विविधता आणण्यासाठी विविध प्रकारचे पुलाव, खिचडी, उसळ, वरण-भात यांसह १२ प्रकारच्या पाककृती निश्चित करण्यात आल्या आहेत,

**All India Media Association*
Nagpur reporter*
*District President*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
*Devashish Govind Tokekar*
*My Youtube Channel*
@devashishtokekar1369
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

बड़ी खबर | दिल्ली-देहरादून ग्रीन एक्सप्रेस-वे पर फिर पलटा सीमेंट लदा ट्रक, पुलिस वैन को मारी टक्कर — 4 पुलिसकर्मियों समेत कई लोग घायल बताए गए
A2Z सभी खबर सभी जिले की06 Oct

बड़ी खबर | दिल्ली-देहरादून ग्रीन एक्सप्रेस-वे पर फिर पलटा सीमेंट लदा ट्रक, पुलिस वैन को मारी टक्कर — 4 पुलिसकर्मियों समेत कई लोग घायल बताए गए

# 🚨🔥 बड़ी खबर | दिल्ली-देहरादून ग्रीन एक्सप्रेस-वे पर फिर पलटा सीमेंट लदा ट्रक, पुलिस वैन को मारी…

पूरी खबर पढ़ें →
— थांग-ता मार्शल आर्ट स्पर्धा में सेंट पॉल स्कूल की शानदार कामयाबी, आयुष और श्रीयांश का विभागीय स्तर के लिए चयन*
Chandrapur06 Oct

— थांग-ता मार्शल आर्ट स्पर्धा में सेंट पॉल स्कूल की शानदार कामयाबी, आयुष और श्रीयांश का विभागीय स्तर के लिए चयन*

*चंद्रपुर, 1 अक्टूबर 2026 :* क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे के अंतर्गत आयोजित *आंतरशालेय जिला…

पूरी खबर पढ़ें →
अंमली पदार्थ व तंबाखूविरोधी कारवाईला वेग शाळा- महाविद्यालय परिसरात विशेष तपासणी मोहीम ; जनजागृतीवरही भर
Bhandara06 Oct

अंमली पदार्थ व तंबाखूविरोधी कारवाईला वेग शाळा- महाविद्यालय परिसरात विशेष तपासणी मोहीम ; जनजागृतीवरही भर

अंमली पदार्थ व तंबाखूविरोधी कारवाईला वेग शाळा- महाविद्यालय परिसरात विशेष तपासणी मोहीम ; जनजागृतीवरही भर विलास केजरकर भंडारा.…

पूरी खबर पढ़ें →
अकोला,उपनगर शिवणी नगरमे महीनो से नही हो रही सफाई,नागरिकों को साथ रोग का डर,संज्ञान ले अकोला नगरपालिका.?
Akola06 Oct

अकोला,उपनगर शिवणी नगरमे महीनो से नही हो रही सफाई,नागरिकों को साथ रोग का डर,संज्ञान ले अकोला नगरपालिका.?

अकोला जिल्हा प्रतिनिधी:-डॉ.पंजाबराव खाडे. अकोला,उपनगर शिवणी उपनगरमे महीनो से नही हो रही सफाई,नागरिकों को साथरोग का डर,संज्ञान लेगी…

पूरी खबर पढ़ें →
बोली भाषेतील शब्दांनी प्रमाण मराठी अधिक समृद्ध झाली – प्रमोद अणेराव अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात कार्यक्रम
Bhandara06 Oct

बोली भाषेतील शब्दांनी प्रमाण मराठी अधिक समृद्ध झाली – प्रमोद अणेराव अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात कार्यक्रम

बोली भाषेतील शब्दांनी प्रमाण मराठी अधिक समृद्ध झाली - प्रमोद अणेराव अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!