स्वखर्चातून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची स्वच्छता; सामाजिक बांधिलकीचा आदर्श!
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


ग्रामपंचायतीच्या मदतीशिवाय स्वयंस्फूर्तीने स्वच्छतेचे काम; नवरात्रोत्सवापूर्वी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पुढाकार
झारगडवाडी : सामाजिक कार्यकर्ते नितीन सुरेश मासाळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने जय तुळजाभवानी माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील काटेरी झुडपे काढून रस्त्याची साफसफाई केली. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त जय तुळजाभवानी माता मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. या काळात भाविकांना मंदिराकडे ये-जा करताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तसेच त्यांचा प्रवास सुरक्षित आणि सोयीस्कर व्हावा, या उद्देशाने नितीन मासाळ यांनी पुढाकार घेतला. रस्त्याच्या कडेला वाढलेली काटेरी झुडपे स्वतःच्या खर्चातून काढून त्यांनी परिसराची स्वच्छता केली.
ग्रामपंचायतीची कोणतीही मदत न घेता त्यांनी केलेल्या या कामातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले आहे.केवळ अपेक्षा न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून समाजसेवा कशी करता येते, याचा आदर्श त्यांनी गावासमोर ठेवला आहे.
त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, गावातील इतर सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि नागरिकांनीही पुढे येऊन स्वच्छता, वृक्षारोपण व इतर समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्वच्छता आणि सामाजिक सहभागातूनच आदर्श गावाची निर्मिती होऊ शकते, असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून मिळत आहे.
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

धार जिले में नरवाई जलाने पर प्रतिबंधात्मक आदेश जारी, उल्लंघन पर लगेगा अर्थदंड कंबाइन हार्वेस्टर के साथ एसएमएस…
पूरी खबर पढ़ें →
आजमगढ़: फूलपुर की ऐतिहासिक रामलीला में गूंजा रावण जन्म का प्रसंग, कुंभकरण के वरदान पर दर्शकों ने ली…
पूरी खबर पढ़ें →
दिल्ली मे जंतर मंतर प्रोटेस्ट मे कवरेज कर रही उल्टा चश्मा चैनल की पत्रकार प्रज्ञा मिश्रा को आज…
पूरी खबर पढ़ें →
आजमगढ़: फूलपुर की ऐतिहासिक रामलीला में गूंजा रावण जन्म का प्रसंग, कुंभकरण के वरदान पर दर्शकों ने ली…
पूरी खबर पढ़ें →
धार।अग्रसेन जयंती महोत्सव के 7 वे दिन शनिवार की शाम वाद विवाद , तात्कालिक एवं फैंसी ड्रेस प्रतियोगिता…
पूरी खबर पढ़ें →
जिला सवांददाता - नंदकिशोर सिंह मेरावी (बालाघाट ) बालाघाट,11 अक्टूबर 2026। जंगली भैंसा पुनर्व्यवस्थापन परियोजना के अंतर्गत असम…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।