Vande Bharat Live TV News
देश • राज्य • जिला — खबरें तेज़, साफ और विश्वसनीय तरीके से
Bhandara

बेशिस्त वाहनचालकांवर आता ‘एआय’ रडारची नजर! अत्याधुनिक एमटीईएस (MTES) वाहन दाखल; नियम मोडल्यास होणार थेट ई- चलन!

16 Oct 2026, 12:02 PM • Vande Bharat Live TV News
📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅
बेशिस्त वाहनचालकांवर आता ‘एआय’ रडारची नजर! अत्याधुनिक एमटीईएस (MTES) वाहन दाखल; नियम मोडल्यास होणार थेट ई- चलन! - भंडारा, महाराष्ट्र

बेशिस्त वाहनचालकांवर आता ‘एआय’ रडारची नजर!

अत्याधुनिक एमटीईएस (MTES) वाहन दाखल;

नियम मोडल्यास होणार थेट ई- चलन!

विलास केजरकर भंडारा.

भंडारा: दिनांक १५_ रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), आता अधिक अद्ययावत झाले आहे. बेशिस्त वाहनचालकांवर करडी नजर ठेवण्यासाठी भंडारा आरटीओच्या ताफ्यात ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (AI) आणि रडार तंत्रज्ञानाने सज्ज असलेले अत्याधुनिक वाहन दाखल झाले आहे. या वाहनाद्वारे जिल्ह्यातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्वयंचलित आणि वेगाने कारवाई केली जाणार आहे.
*१८० डिग्री फिरणार कॅमेरा*;

*रात्री अन् धुक्यातही कारवाई*

या अत्याधुनिक वाहनाच्या छतावर ‘मोबाईल ट्रॅकिंग एन्फोर्समेंट सिस्टिम’ (MTES) ही विशेष प्रणाली बसवण्यात आली आहे. यातील कॅमेरा १८० डिग्रीच्या कोनात फिरून रस्त्यावरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल. यात रडारसोबतच विशेष 'इन्फ्रारेड लाईट्स'चा वापर करण्यात आल्यामुळे रात्रीच्या अंधारात किंवा दाट धुक्यातही नियम तोडणाऱ्या वाहनांचे स्पष्ट चित्रीकरण होणार आहे. यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कारवाई करणे आरटीओ प्रशासनाला शक्य होणार आहे.
*या' नियमांचा भंग केल्यास थेट चलन*
हे वाहन भंडारा शहरातील विविध भागांसह महामार्ग आणि ग्रामीण भागांमधील अपघातप्रवण क्षेत्रांत गस्त घालणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील उल्लंघनांवर स्वयंचलित (ऑटोमॅटिक) ई-चलन केले जाईल:सीट बेल्ट न लावणे व हेल्मेट न वापरणे, वेगमर्यादा (Speed Limit) ओलांडणे
ट्रिपल सीट प्रवास करणेचुकीच्या दिशेने (Wrong Side) वाहन चालवणे वाहनाच्या कागदपत्रांची (फिटनेस, इन्शुरन्स इत्यादी) मुदत संपलेली असणे.

*जिल्ह्यातील सातही तालुक्यांत धावणार वाहन*
हे तंत्रज्ञान केवळ शहरापुरते मर्यादित नसून भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केले जाणार आहे. जिथे वाहतुकीच्या नियमांचे सर्वाधिक उल्लंघन होते, अशा ठिकाणी ही वाहने तैनात केली जातील.
*बेशिस्त वाहनचालकांवर बसणार वचक*
"या अत्याधुनिक प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेप न होता थेट स्वयंचलित ई-चलन जारी होणार आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर वचक बसेल आणि रस्ते अपघात कमी होण्यास मोठी मदत होईल." असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगितले आहे.
[16/10, 06:51] devashishtokekar05: **All India Media Association*
Nagpur reporter*
*District President*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
*Devashish Govind Tokekar*
*My Youtube Channel*
@devashishtokekar1369
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

📣 शेयर करें: Facebook X Telegram LinkedIn लिंक कॉपी हो गया ✅

🔔 Vande Bharat News Alerts

नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

संबंधित और ताज़ा खबरें

Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Nagpur16 Oct

धर्मचक्र प्रवर्तन दिन के लिए- अजनी रेलवे-स्टेशन पर कुछ ट्रेनों का अस्थाई रूप से ठहराव रहेगा

प्राप्त हुई जानकारी के अनुसार धर्मचक्र प्रवर्तन दिन पर नागपुर पहुंचने वाले यात्रियों की सुविधा के लिए मध्य…

पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Nagpur16 Oct

अब बाजारों , दुकानों में धनिया , मिर्च, हल्दी, गर्म मसालों के पावडर बिना पैकिंग के खुले में बेचने की अनुमति नहीं होगी

महाराष्ट्र राज्य खाद्य औषधि प्रशासन/ एनडीए, ने अब राज्य के बाजारों, दुकानों में खुले मसालों, हल्दी,मिर्च, धनिया, पावडर,…

पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV NewsVande Bharat Live TV News
Nagpur16 Oct

चुनाव आयोग ने 17राज्यों और केंद्र शासित प्रदेश शोध में वोटर लिस्ट स्पेशल रिवीजन कराने का आदेश दिया है

प्राप्त हुई ताजा जानकारी के अनुसार केंद्रीय चुनाव आयोग कल 15 अक्टूबर को देश के 17 राज्यों और…

पूरी खबर पढ़ें →
भाग 6 ते 10 *चढ-उतार : एका आयुष्याची कहाणी* – *-धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर* 🪶 *प्रकरण ६ : पैशाची किंमत आणि स्वाभिमानाचे धडे*
इमाव, विमाप्र व विजाभज विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी सुरू; ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत
Bhandara16 Oct

इमाव, विमाप्र व विजाभज विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी सुरू; ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

इमाव, विमाप्र व विजाभज विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी सुरू; ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत विलास केजरकर भंडारा. भंडारा, दिनांक १५…

पूरी खबर पढ़ें →
युवा शेतकऱ्यांनी कृषी उद्योगाकडे वळावे- जिल्हाधिकारी सावन कुमार भंडारा युवा शेतकरी मंचातर्गत कार्यशाळा
Bhandara16 Oct

युवा शेतकऱ्यांनी कृषी उद्योगाकडे वळावे- जिल्हाधिकारी सावन कुमार भंडारा युवा शेतकरी मंचातर्गत कार्यशाळा

युवा शेतकऱ्यांनी कृषी उद्योगाकडे वळावे- जिल्हाधिकारी सावन कुमार भंडारा युवा शेतकरी मंचातर्गत कार्यशाळा विलास केजरकर भंडारा. भंडारा- :…

पूरी खबर पढ़ें →
error: Content is protected !!