माहिती अधिकार अर्जावर माहिती नाही, प्रथम अपीलावरही निर्णय नाही!

माहिती अधिकार अर्जावर माहिती नाही, प्रथम अपीलावरही निर्णय नाही!
मुख्याध्यापक महादेव दे यांच्या विभागीय चौकशीसंदर्भात डॉ. पिंटू पाल यांचे राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील
चंद्रपूर / गडचिरोली : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मागूनही संबंधित विभागाकडून माहिती उपलब्ध करून दिली जात नसल्याचा आरोप करीत चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथील डॉ. पिंटू दयाल पाल यांनी महाराष्ट्र राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीठाकडे द्वितीय अपील दाखल करण्याची तयारी केली आहे.
डॉ. पिंटू पाल यांनी दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद गडचिरोली येथील जन माहिती अधिकाऱ्यांकडे माहिती अधिकार अर्ज सादर केला होता. या अर्जाद्वारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येनापूर क्र. १६, तालुका चामोर्शी येथील मुख्याध्यापक महादेव दे यांच्याविरुद्ध केलेल्या दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ च्या तक्रारीवर झालेली कार्यवाही आणि विभागीय चौकशीसंदर्भातील अधिकृत कागदपत्रे व माहिती मागविण्यात आली होती.
मात्र, निर्धारित मुदतीत माहिती प्राप्त न झाल्याने डॉ. पिंटू पाल यांनी दिनांक ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषद गडचिरोलीच्या प्रथम अपीलीय अधिकाऱ्यांकडे प्रथम अपील दाखल केले. हे अपील नोंदणीकृत टपालाद्वारे पाठविण्यात आले असून त्याची टपाल पावती व पोहोचल्याचा पुरावा त्यांच्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
तथापि, प्रथम अपील दाखल करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणताही लेखी निर्णय किंवा मागितलेली माहिती प्राप्त झालेली नसल्याचा आरोप डॉ. पाल यांनी केला आहे.
या प्रकरणात माहितीचा अधिकार अधिनियमाच्या कलम ७(१), १९(६) आणि १९(३) अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची तपासणी करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच मागितलेली माहिती विनामूल्य उपलब्ध करून द्यावी आणि कायदेशीर अटी पूर्ण होत असल्यास जबाबदार जन माहिती अधिकाऱ्याविरुद्ध कलम २०(१) अंतर्गत दंडात्मक कार्यवाहीचा विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. Distric Repoter Dr.Pintu Paul Vande Bharat Live tv
शासकीय विभागीय चौकशीसंदर्भातील माहिती नागरिकांना मिळणार नसेल, तर माहिती अधिकार कायद्याचा नेमका उपयोग काय? असा सवाल उपस्थित करीत डॉ. पिंटू पाल यांनी या प्रकरणात पारदर्शकता आणि प्रशासकीय जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.
आता या प्रकरणात महाराष्ट्र राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीठ काय भूमिका घेते आणि संबंधित विभागाकडून माहिती कधी उपलब्ध करून दिली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
– डॉ. पिंटू दयाल पाल
चिचपल्ली, जिल्हा चंद्रपूर
स्वतंत्र भारत पक्ष – शेतकरी संघटना
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।






