चिचपल्लीजवळ NH-930 महामार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
🔔 Vande Bharat News Alerts
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।


चंद्रपूर | प्रतिनिधी Dr.Pintu Paul Distric Repoter
गडचिरोली–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-930 वर चिचपल्ली गावाजवळ दूध नालियाच्या परिसरात गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६:३० वाजताच्या सुमारास ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार तिरुपती कोंटुंबे (वय ३३, रा. जिवती) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर नितेश गिरे (वय २०) हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चिचपल्ली गावाजवळ दूध नालियाच्या परिसरात ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता एवढी होती की दुचाकीवरील तिरुपती कोंटुंबे यांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातात सहभागी असलेल्या ट्रकचा क्रमांक MH34 BG 8086 असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. रामनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून जखमी नितेश गिरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, ट्रक व दुचाकीची धडक कशी झाली आणि इतर संबंधित बाबींचा पोलीस तपास करीत आहेत. ट्रकचालकाचा शोध घेण्यासह अपघाताच्या सर्व बाजूंची चौकशी होणे आवश्यक आहे.
महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
गडचिरोली–चंद्रपूर NH-930 महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. विशेषतः सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनीही रस्ते सुरक्षा उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
NEED 24 NEWS कडून या घटनेबाबत अधिकृत पोलीस माहिती मिळाल्यानंतर पुढील अपडेट देण्यात येईल.
नई प्रमुख खबरों की browser notification पाने के लिए Subscribe करें।

कोरिया (छत्तीसगढ़)। जिले के एकलव्य आदर्श आवासीय विद्यालय (EMRS), घूघरा के प्राचार्य वी.के. सिंह पर एक पत्रकार के…
पूरी खबर पढ़ें →
Vande Bharat Live TV Newsसमीर वानखेड़े ब्यूरो चीफ: आष्टी (चामोर्शी), गडचिरोली | 27 नवंबर 2026: गडचिरोली जिले की चामोर्शी तहसील के अंतर्गत…
पूरी खबर पढ़ें →
समीर वानखेड़े ब्यूरो चीफ: आष्टी (चामोर्शी), गडचिरोली | 27 नवंबर 2026: गडचिरोली जिले की चामोर्शी तहसील के अंतर्गत…
पूरी खबर पढ़ें →
समीर वानखेड़े ब्यूरो चीफ: आष्टी (चामोर्शी), गडचिरोली | 27 नवंबर 2026: गडचिरोली जिले की चामोर्शी तहसील के अंतर्गत…
पूरी खबर पढ़ें →
समीर वानखेड़े ब्यूरो चीफ: आष्टी (चामोर्शी), गडचिरोली | 27 नवंबर 2026: गडचिरोली जिले की चामोर्शी तहसील के अंतर्गत…
पूरी खबर पढ़ें →
समीर वानखेड़े ब्यूरो चीफ: आष्टी (चामोर्शी), गडचिरोली | 27 नवंबर 2026: गडचिरोली जिले की चामोर्शी तहसील के अंतर्गत…
पूरी खबर पढ़ें →
तेज़ खबरें सीधे अपने मोबाइल की Home Screen पर पाएँ।
App केवल Vande Bharat Live TV News की official website से install करें।