
प्रेस नोट
नागपूर प्रतिनिधि
सशस्त्र पोलीस शिपाई भरती
लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली
नागपूर, दि. 11 : समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 नागपूरच्या आस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील 242 रिक्त पदांची सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 ची शारीरिक चाचणी प्रक्रिया 19 जून ते 5 जुलै 2024 रोजीपर्यंत राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 4 च्या कवायत मैदान येथे राबविण्यात आली होती.
शारीरिक चाचणीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे 1:10 प्रमाणे गुणवत्तेनुसार तसेच प्रवर्गनिहाय लेखी परीक्षेसाठी 3 हजार 203 उमेदवार पात्र ठरलेले असून या उमेदवारांची लेखी परीक्षा 14 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु लेखी परीक्षा तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे, असे समादेशक तथा राज्य राखीव पोलीस बलाच्या पोलीस भरती अध्यक्ष डॉ. प्रियंका नारनवरे यांनी स्पष्ट केले आहे.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
रिपोर्टर देवाशिष टोकेकर