
प्रेस वार्ता
नागपूर प्रतिनिधि
धाराशिव (उस्मानाबाद)
*मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (मार्टी)या संस्थेची स्थापना व निधी उपलब्ध करून देणे करिता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक विभाग प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून माननीय मुख्यमंत्री, अल्पसंख्यांक मंत्री,व अल्पसंख्यांक आयोग यांना या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
आज रोजी तहसील कार्यालय येथे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तौफिक शेख , अल्पसंख्यांक शहराध्यक्ष वाहेद शेख यांच्यावतीने मागणीचे निवेदन तहसीलदार साहेब यांना देण्यात आले. मार्टी या संस्थेची स्थापना झाली तर अल्पसंख्याक समाजातील मुला-मुलींना याचा फायदा होईल व शैक्षणिक मागास प्रमाणात कमतरता येईल अल्पसंख्याक समाज काही प्रमाणात मुख्य प्रवाहात आल्याशिवाय राहणार नाही असे मत जिल्हाध्यक्ष तौफिक शेख यांनी व्यक्त केले.*
*यावेळी शहर उपाध्यक्ष मगसूद शेख प्रभारी युवक तालुका अध्यक्ष शरद जगदाळे युवक शहराध्यक्ष अक्षय परमेश्वर अल्पसंख्यांक तालुका कार्याध्यक्ष आरिफ भाई बागवान,अल्पसंख्यांक विधानसभा तालुका अध्यक्ष इब्राहिम इनामदार अल्पसंख्यांक विधानसभा उपाध्यक्ष चांद नदाफ निसार शानेदिवान राहील पटेल.
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज नागपूर
संपादक
पोलिस मित्र महासंघ नागपूर शहर अध्यक्ष देवाशिष टोकेकर