
संजय पारधी बल्लारपूर
चंद्रपूर : जिल्हा प्रशासन चंद्रपूर द्वारा आयोजित आपत्ती व्यवस्थापन जनजागृती निमित्ताने महा मॅरेथॉन स्पर्धा ऐक धाव सुरक्षेची या भव्य रॅलीचे आयोजन चांदा क्लब ग्राउंड येथून करण्यात आली या रॅलीला मा.जिल्हाधिकारी जी. सी. गौडा साहेब यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार साहेब उपजिल्हाधिकारी कुंभार साहेब उपविभागीय अधिकारी संजय पवार साहेब नायब तहसीलदार गादेवार् साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरवात करण्यात आली सदर रॅली चांदा क्लब येथून जटपुरा गेट व रामनगर मार्गे परत चांदा क्लब येथे समापण करण्यात आली सर्व प्रथम योगनृत्य परिवार चे जनक भाईश्री गोपालजी मुंधडा जिल्हा प्रभारी सुरेश घोडके संतोष पिंपळकर प्रकाश गुंठ्ठेवार मनोज बोरसरे अशोक पडगेलवार विठ्ठल देशमुख विशाल गुप्ता प्रवीण खेकारे उमेश हिवरे मनोज डांगरे यांच्या नेतृत्वात शालेय विध्यार्थाना योगनृत्याचे धडे देण्यात आले विद्या धोटे चित्रा धात्रक उमा वानखेडे अश्विनी आस्तुणकर रुबीना शेख संगीता जुनघरे निशा राजपूत निता नागतुरे प्रियंका राऊल इत्यादिनि चंद्रपूरातील उपस्थित विध्यार्थी व सर्व स्पर्धकाकडून योगडान्स् करवून घेतला योगनृत्यामुळे शरीरिक मानसिक व आध्यात्मिक विकास होतो मन फ्रेश राहते विचार शक्ती वाढते बुध्दी तल्लक राहते शरीरिक स्वास्थ चांगले राहते या करिता योगडान्स् करावा असे शिक्षक वृंदाणा प्रबोधन करताना भाईश्री गोपालजी मुंधडा यांनी सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व अधिकारी वर्ग शाळेचे शिक्षक वृंद व स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धक व सर्व विध्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेत स्पर्धा यशस्वी केली सूत्र संचालन धनंजय तावादे तर आभार प्रदर्शन अशोक पडगेलवार यांनी मानले सर्व स्पर्धकांना टी शर्ट व टोपी देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.