A2Z सभी खबर सभी जिले की

राहुरी विधानसभा मतदारसंघांमधून शिवाजी कर्डीले हेच महायुतीचे उमेदवार

अहमदनगर :(प्रतिनिधी ) राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आत्तापासूनच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. दोन्ही गटांकडून या ठिकाणी मोर्चे बांधणी सुरू आहे.लोकसभा निवडणुकीनंतर आता लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकीकडे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. आताच मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी महायुतीची जागा वाटप संदर्भात एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे.या बैठकीत 2019 मध्ये ज्या पक्षाचा आमदार निवडून आला आहे त्याच पक्षाला ती जागा किंवा क्रमांक 2 चा जो उमेदवार होता तोच देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. म्हणजेच महायुतीने सीटिंग-गेटिंग हा फॉर्म्युला निश्चित केला आहे. यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार राहणार हे जवळपास निश्चित झाले आहे.Screenshot 2024 0923 051954वंदे भारत न्यूज करिता रिपोर्टर शहाजी दिघे

 

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!