A2Z सभी खबर सभी जिले की

महाराष्ट्र विधानसभा मतदान च्या अनुषंगने चंद्रपुर जिल्ह्यात कलम 37 लागू


सुमिता शर्मा चंद्रपुर महाराष्ट्र:
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर आदर्श आचार संहिता लागू झाली आहे.  तसेच विविध धार्मिक कार्यक्रम व दिवाळी सण, गुरुनानक जयंतीती असल्याने 1 नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) लागू करण्यात आले आहे.
सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खालील गोष्टींना मनाई करण्यात आली आहे.  
1. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुरे, काठया, लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधणे बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्ये वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर नितीमता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे ,अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तु तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे.
2. तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी अथवा संबंधित पोलिस स्टेशन अधिकारी (जे लागू असेल ते) यांचे पूर्वपरवानगीशिवाय कोणीही सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत, सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. हा आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागू राहतील.

3. या आदेशाच्या प्रती उपविभागीय दंडाधिकारी, (सर्व) तालुका दंडाधिकारी (सर्व), संवर्ग विकास अधिकारी (सर्व) महानगरपालिका/नगर परिषद /नगर पंचायत/ ग्राम पंचायत (सर्व) पोलीस स्टेशन अधिकारी (सर्व) यांचे नोटीस बोर्डावर लावून प्रसिध्द करावे. हा आदेश सहज दिसण्याजोग्या जागी लावावा, हा आदेश कर्तव्यावरील शासकीय कर्मचारी यांना लागू होणार नाही. हे आदेश आज दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हादंडाधिकारी यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे.

Vande Bharat Live Tv News
Show More
Back to top button
error: Content is protected !!