

समीर वानखेडे चंद्रपूर महाराष्ट्र:
भारत निवडणूक आयोगाने IPS संजय वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या आठवडाभर आधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने माजी डीजीपी रश्मी शुक्ला यांची बदली केली होती.
शुक्ला यांची हकालपट्टी केल्यानंतर निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडून महाराष्ट्र केडरमधील तीन सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे मागवली होती, ज्यापैकी वर्मा हे एक होते. अन्य दोन वरिष्ठ अधिकारी वर्मा यांचे बॅचमेट संजीव कुमार सिंघल आणि रितेश कुमार होते.
IPS संजय वर्मा हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत आणि सध्या डीजी लॉ आणि टेक्निकल म्हणून कार्यरत आहेत. ते एप्रिल 2028 मध्ये निवृत्त होणार आहेत आणि महाराष्ट्र डीजीपी पदासाठी विचारात घेतलेल्या यादीत ते सर्वात वरचे स्थान वर होते.





