समीर वानखेडे चंद्रपूर महाराष्ट्र:
बल्लारपूरच्या लाडक्या बहिणींसाठी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपल्या वचननाम्यात खास योजना आखल्या आहेत. वचन पाळणारा नेता अशी ओळख बनवलेल्या सुधीरभाऊंनी आता महिला-भगिनींच्या उत्कर्षासाठी पाऊले उचलली आहेतच. पुन्हा निवडून आल्यानंतर चार प्रमुख आश्वासने पूर्ण करण्यावर त्यांचा भर राहणार आहे.
हेल्पलाईन नंबर
महिला सुरक्षेचा मुद्दा अनेकदा ऐरणीवर येतो. बल्लारपूरच्या महिला सुरक्षित असल्या तरी कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि संकटसमयी तत्काळ मदत मिळावी, यासाठी सुधीरभाऊंनी महिला सुरक्षिततेसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्याचे ठरवले आहे. अर्थात, त्यांचे वचन म्हणजे २०२५ मध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणीच.
पोलिसांत वाढवणार महिलाराज
स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यावर सुधीरभाऊ भर देणार आहेत. जेणेकरून घरे सांभाळणाऱ्या सक्षम महिला आता आपल्या परिसरावरही चांगले संस्कार करतील.
महिला उद्योजिका
बचत गटांच्या माध्यमातून आजवर महिलांसाठी रोजगारनिर्मिती झाली असली तरी आता उद्योग स्थापन करून महिलांना उद्योजिका बनवून संपूर्ण स्वावलंबी बनवण्याचा विडा सुधीरभाऊंनी उचलला आहे.
महिला बचत गटांसाठी मॉल्स
बचत गटांमार्फत निर्माण होणाऱ्या विविध उत्पादनांना आता आधुनिक बाजारपेठ (मॉल्स) मिळवून देण्याचा संकल्प सुधीरभाऊंनी केला आहे. त्यामुळे, महिलांची उत्पादनेही मॉल्समधून विक्रीसाठी उपलब्ध होतील.