
राजुरा : निवडणुकी दरम्यान विविध प्रलोभने दाखवून
मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या घटना समोर येत असताना मतदानापुर्वी मध्यारात्रीच्या सुमारास गडचांदूरात निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे, यांच्या निवडणूक प्रचारातील साहित्य व जवळपास 61 लाखांची रोकड जप्त केली आहे. तक्रार केल्यानंतर निवडणूक आत्योगाने रात्री उशिरा येथील एका संशयित घरावर धाड टाकत ही रक्कम जप्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा विधानसभा प्रमुख अरूण निमजे यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात बाहेरील महिला, पुरुष व बाऊंसर नेमून मतदारांना पैसे वाटप करण्याचा कट रचला जात असल्याचे समोर आले आहे. जप्त केलेली रक्कम निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्यात आली असून, या घटनेने निवडणुकीच्या निष्पक्षतेवर मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.? सध्या राजुरा विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून निवडणूक आयोगाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.