संजय पारधी चंद्रपुर, महाराष्ट्र
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर तर्फे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले बल्लारपूर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार व चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट विभाग प्रमुख विवेक आंबेकर, प्राथमिक विभाग प्रमुख सौ सरिता सोनकुसरे, शहर अध्यक्ष संजय कांचरलावार , तालुका अध्यक्ष देविदास चवले, विनय कावडकर तथा शिक्षक परिषदेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.