
अहिल्यानगर : दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि अहमदनगर स्टाफ स्पोर्ट्स अँड रिक्रिएशन असोसिएशन,अहमदनगर आयोजित बँक सेवकांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन २०२४-२५ नुकतीच बुवाजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी या ठिकाणी पार पडली
या स्पर्धेत संगमनेर तालुका संघ विजयी झाला तर अहमदनगर तालुका संघ उपविजेता ठरला. बँकेचे चेअरमन मा. श्री. शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी पाथर्डी तालुक्याचे आमदार तसेच बँकेच्या संचालिका मा. श्रीमती मोनिकाताई राजळे याही उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी विजयी संघाचे अभिनंदन केले तसेच सहभागी इतर संघांचे देखील कौतुक केले. हे स्पर्धेचे तिसरे वर्ष होते.
यावर्षी स्पर्धेचे आयोजन पाथर्डी तालुक्याकडे होते. पाथर्डी तालुक्याने स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले. विजय संगमनेर संघाचे बँकेचे व्हाईस चेअरमन मा. श्री. माधवराव कानवडे साहेब तसेच संचालक मा. श्री. गणपतराव सांगळे साहेब यांनी अभिनंदन केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रावसाहेब वर्पे साहेब यांनी देखील संघाचे अभिनंदन केले. संघ निवडण्यामध्ये तालुका विकास अधिकारी श्री. अशोक थोरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तसेच संघाला योग्य मार्गदर्शन केले.विजयी संघ मनोजकुमार जेडगुले (कर्णधार ),अनिल नवले, महेश कर्पे,
सचिन गोडे, डी एम पुरी, चेतन देशमुख, प्रशांत आग्रे, वैभव कहांडळ, आनंदसिंग परदेसी, गणेश गोसावी, योगेश गांगुर्डे असा होता.