A2Z सभी खबर सभी जिले की

वीज बिल ऑनलाइन भरा आणि स्मार्टफोन जिंका

महावितरणचा ग्राहकांसाठी उपक्रम

समीर वानखेडे चंद्रपूर महाराष्ट्र:
महावितरणने ग्राहकांना त्यांचे वीजबिल डिजिटल पद्धतीने भरता यावे यासाठी वेबसाइट आणि महावितरणचे मोबाइल ॲप उपलब्ध करून दिले आहे. राज्यातील ७० टक्क्यांहून अधिक वीज ग्राहक ऑनलाइन वीजबिल भरत आहेत. हे प्रमाण वाढवण्यासाठी महावितरणने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. ग्राहकांना सलग तीन किंवा अधिक वीजबिले भरून योजनेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
1 जानेवारी ते 31 मे दरम्यान सलग तीन किंवा अधिक वीजबिल भरावे लागणार आहे. दर महिन्याला एक लकी ड्रॉ: महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर असे तीन लकी ड्रॉ ऑनलाईन काढले जातील, एप्रिल, मे आणि जून महिन्यात एक. लकी ड्रॉसाठी पात्र होण्यासाठी किमान वीज बिल 100 रुपये असावे. प्रत्येक लकी ड्रॉमध्ये प्रत्येक उपविभागातून पाच विजेते निवडले जातील. विजेत्यांना स्मार्ट फोन आणि स्मार्ट घड्याळे दिली जातील. थकबाकी असलेले ग्राहक या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.

Back to top button
error: Content is protected !!