A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

महाराष्ट्र पालकमंत्री पदाची यादी जाहीर

फडणवीस सरकारने मुनगंटीवार यांना डावलले

1737255788238

वंदे भारत लाईव टीव्ही न्यूज राजुरा

 

महाराष्ट्र राज्यात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. कोणत्या मंत्र्यांला कोणते खाते मिळणार हा ही विषय संपुष्टात आला तोच कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार हा प्रश्न चर्चेला आला होता. महायुतीमध्ये खातेवाटपाच्या तिढ्यानंतर पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढला आहे. बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. महायुती सरकारने अखेर बहुप्रतिक्षित पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना चांगलाच फटका बसला आहे. धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. बीडचे पालकमंत्री अजित पवार असणार आहे. अजितदादांकडे बीड आणि पुण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहे

.महाराष्ट्रातील पालकमंत्र्याची यादी

> गडचिरोली – देवेंद्र फडणवीस

> नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे

! चंद्रपूर – अशोक उईके

! सिंधुदुर्ग -नितेश राणे

> ठाणे – एकनाथ शिंदे

> पुणे – अजित पवार

> बीड – अजित पवार

> अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे

> अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील

> वाशिम – हसन मुश्रीफ

> सांगली – चंद्रकांत पाटील

> सातारा – शंभुराजे देसाई

> छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट

> जळगाव – गुलाबराव पाटील

> यवतमाळ – संजय राठोड

> कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ

> अकोला – आकाश फुंडकर

> भंडारा – संजय सावकारे

> बुलढाणा – मंकरंद जाधव

> धाराशीव – प्रताप सरनाईक

> धुळे – जयकुमार रावल

> गोंदिया – बाबासाहेब पाटील

> हिंगोली – नरहरी झिरवळ

> लातूर – शिवेंद्रसिंग भोसले

> मुंबई शहर – एकनाथ शिंदे

> मुंबई उपनगर – आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा/

> नांदेड – अतुल सावे

> नंदुरबार – मानिकराव कोकाटे

> नाशिक – गिरीश महाजन

> पालघर – गणेश नाईक

> परभणी – मेघना बोर्डीकर

> रायगड – अदिती तटकरे

> सिंधुदुर्ग- नितेश राणे

> रत्नागिरी – उदय सामंत

> सोलापूर – जयकुमार गोरे

> वर्धा – पंकज भोयर

> जालना – पंकजा मुंडे

[yop_poll id="10"]
Show More
Back to top button
error: Content is protected !!