थाणेमहाराष्ट्र

शिव सेना माननीय माझी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे कोकण सभा मध्ये टीका केली आहे

04.02.2024तेव्हा मिंध्यांना दाढी खेचून आणलं असतं पण… उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असून त्यांची आज कणकवली येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं त्याआधीच आपल्याला बंडाची चाहूल लागल्याचे त्यांनी म्हटले

मुंबई, ४ फेब्रुवारी २०२४ : उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असून त्यांची आज कणकवली येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं त्याआधीच आपल्याला बंडाची चाहूल लागली होती. ते म्हणाले, आमदार फुटत आहे, मला काय कळलं नव्हतं? असा सवाल करत मी पण हॉटेलमध्ये डांबून ठेवू शकलो असतो. हे आमदार जात असताना मला कळाले नव्हते का? मिंध्याची दाढी पकडून आणता आले नसते का? पण मी जेवढे सडके आहेत तेवढ्यांना जावू दिलं, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. भाजप हा हुकूमशाही मार्गाने जात आहे. भाजप ज्या दिशेने देश नेत आहे तो मार्ग हुकूमशाहीचा आहे. त्यामुळे तुम्हाला हा मार्ग नको असेल तर भाजपला हद्दपार करा…अब की बार, भाजप तडीपार हा नारा असला पाहिजे, असे म्हणत खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

FacebookMastodonEmailWhatsAppLinkedInTwitterXTelegram
Back to top button
error: Content is protected !!