A2Z सभी खबर सभी जिले की

*सावनेर येथील आंबेडकरी अनुयायांचे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन*

सावनेर : सावनेर येथील खापा रोड रोड जय भीम चौकामध्ये 28 जानेवारी 2025 रोजी नगर परिषद सावनेरच्या अतिक्रमण हटवीण्याच्या कारवाईच्या वेळी आरोपी न. प. कर्मचारी धीरज देशमुख व इतर 2 यांच्या द्वारे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची अवमानना करण्यात आली होती व अनुचित पणे प्रतिमा हाताळून न. प. च्या कचरा नेण्याच्या वाहनात टाकण्यात आली होती. यानंतर सावनेर शहरातील आंबेडकर अनुयायांनी सावनेर पोलीस स्टेशन येथे जाऊन आरोपी विरोधात अनुसूचित जाती संरक्षण कायद्या अंतर्गत न. प. कर्मचारी धीरज देशमुख व इतर 2 आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तरी अद्याप आरोपी व त्याच्या साथीदारस अटक केली नाही. उलट निर्दोष आंबेडकरी अनुयायी नंदन मडके, अक्षय भोयर व सुशील ब्रम्हरक्षे यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथडा निर्माण करण्याच्या बी एन एस 132, 296, 3(5) अननवे गुन्हा नोंद करून आंबेडकरी अनुयायांना बदनाम करण्याचे षडयंत्र करण्यात आले. त्यामुळे दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी विविध आंबेडकरी संघटनाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी उपविभागीय अधिकारी सावनेर व उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर यांना भेटून उक्त आरोपी विरोधात तात्काळ अटक करून यां गुन्ह्यातील मास्टरमाईंड शोधून व असा बेकायदेशीर आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करावी यां आश्याचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जनकल्याण सामाजिक बहुदेशीय संस्था अध्यक्ष मा. भगवान चांदेकर, बी पी एस संयोजक भा. मयूर नागदवणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्ट्स अँड एज्युकेशन सेंटर सावनेर चे अध्यक्ष मा. विनोदजी बागडे, समयक सार्वजनिक वाचनालय सावनेर चे उपाध्यक्ष एड. शामरावजी गोंडुळे, वंचित बहुजन आघाडी नागपूर जिल्हा महासचिव दादाराव लांजेवार, रत्नमालाबाई रागासे, मनोरमाबाई चवारे, सामाजिक कार्यकर्ता विनीत पाटील, नितीन गोलाईत, सुशील रंगारी, सुशील ब्रह्मरक्षे, सुरज आवळे, रवी कुमार सूर्यवंशी, प्रशांत रागासे, धनंजय बागडे, अक्षय सोमकुवर, रघु बागडे , सहदेव पाटील, राजेश ब्रह्मराक्षे, विशाल वासनिक, स्वप्निल पाचभावे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सावनेर तालुका प्रतिनिधी : सूर्यकांत तळखंडे 9881477824

Vande Bharat Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!