
प्रेस नोट
प्रतिनिधि नागपूर शहर
मनीष उपाध्ये दिग्दर्शीत “दिंडी आली दारावर…..” ला उत्तम प्रतिसाद
श्री. मनीष उपाध्ये यांनी संगीत दिग्दर्शित केलेल्या ” आर्त ” या मराठी गाण्यांच्या अल्बम मधील ” दिंडी आली दारावर चला पंढरीला जाऊ……” हा यामिनी पायघन यांनी गायलेल्या अभंगाला युट्यूब या माध्यमावर नुकतेच 1 लाख व्ह्युज पार केलेत.हा अभंग सध्या खूप लोकप्रिय होतो आहे.
या अभंगाचे वैशिष्ट म्हणजे गीतातून अनुभवायला मिळणाऱ्या सांगितीक वारीची फलश्रुतीच ही आहे की ,विठ्ठल स्वतः ,कधी सुर रूपात तर कधी निरागस ‘बाल वारकरी ‘रूपात या स्वरदिंडीत संमीलित होतो आणि भक्ताच्या मन मंदिरा द्वारी सुखाची वारी घेऊन येतो .साऱ्यांचे मन आनंदाभूतीने भाव विभोर होऊन जाते.
बाल विठ्ठलाचे काम चि. चैतन्य पायघन या बाल कलाकाराने केले आहे.
याचे संगीत संयोजन पुष्कर देशमुख यांचे आहे.
मनीष उपाध्ये यांनी संगीत दिग्दर्शित केलेला त्यांचा “साद” हा मराठी गाण्यांचा पहिला अल्बम लोकप्रिय आहेच.
त्यांनी रोड सुरक्षा गीत ज्याचे लोकार्पण मा. श्री. नितीन जी गडकरी यांच्या हस्ते झाले . ते ही गीत लोकप्रिय झाले आहे.
” साद ” आणि ” आर्त ” या अल्बम मधील काही गाणी All India Radio ने मान्यता प्राप्त केली असून ती आकाशवाणी केंद्रावरून प्रसारीत करण्यात येत असतात.
“दिंडी आली दारावर…… ” हा अभंग विठ्ठलाच्या चरणी समर्पित करीत आहोत.
VANDE Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Plot no.18/19,Flat no.201,Harmony emporise Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur -440015