A2Z सभी खबर सभी जिले कीउल्हासनगरकोल्हापुरखेलथाणेधाराशिवनागपुरनासिकपुणेमहाराष्ट्रमुंबईलातूरसंगमनेर

मुकेश पाण्डेयची राष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून निवड

ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

 

:- दिनांक १८ ते २२ फेब्रुवारी २०२५ कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले रुहेलखंड, बरेली विद्यापीठ येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी ग्रेपलिंग चॅम्पियनशिप २०२४-२५ साठी स्थानिक पँथर्स स्पोर्ट्स अकॅडमी चंद्रपूरचे श्री मुकेश भीमसेन पाण्डेय (कुस्ती NIS कोच ) यांची निवड ग्रेपलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व ग्रेपलिंग ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत करण्यात आली आहे तरी या स्पर्धेला संपूर्ण भारताचे नामांकित पंचाची निवड करण्यात आली. होणाऱ्या या अखिल भारतीय विद्यापीठ स्तरीय ग्रेपलिंग स्पर्धा २०२४-२५ बरेली विद्यापीठ मध्ये दिनांक १७ ते २३ फेब.२०२५ या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार. अशा आनंदाचे वेळी ग्रेपलिंग असोशिएशन ऑफ महाराष्ट्र (GAM) चे महासचिव श्री. संतोष देशमुख सर, अध्यक्ष श्रीमती अर्चना देशमुख मैडम, महाराष्ट्राचे टेक्निकल हेड श्री. संदिप बोरसे सर, व राज्याचे सर्व पदाधिकारी तसेच चंद्रपूर जिल्हा ग्रेपलिंग असोशिएशनचे अध्यक्ष प्राचार्य श्री. उमेश पंधरे सर, श्री. भुषण देशमुख, श्री. संजय पारधी, श्री. सुमित शुक्ला, श्री. अनिल ठाकुर, व बाकी पदाधिकारी व सहकारी यांनी पुष्पगुच्छ व शब्दसुमनाने खुप खुप अभिनंदन केला व होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धसाठी शुभेच्छा दिल्या.

Back to top button
error: Content is protected !!