
वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज राजुरा :-जिवती तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता तालुक्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देत प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी काल (दि. १८) येथील पंचायत समितीच्या सभागृहात तालुका प्रशासनाची आढावा बैठक घेतली.
सदर बैठकीदरम्यान तालुक्यात तसेच नगरपंचायत जिवतीकडून शहरात विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांचा व इतर महत्त्वाच्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. प्रसंगीच केंद्र व राज्य सरकारच्या सर्व लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरीता विभागप्रमुखांना अनेक सुचना केल्या.
जिवती हा आकांक्षित तालुका आहे. त्यामुळे जिवती तालुक्याच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य-जबाबदारीची जाण व सेवाभाव जोपासून काम करावे. कोणतीही अडचण भासल्यास शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी मी सोबत आहे. असे प्रतिपादन यावेळी बोलताना केले.
सदर बैठकीला तहसीलदार रुपाली मोगरकर, संवर्ग विकास अधिकारी दोडके, मुख्याधिकारी सागर मुळीक, वनपरिक्षत्रेधिकारी लंगडे, पोलिस निरीक्षक पांडे, सर्व विभागप्रमुख, माजी पं. स. उपसभापती महेश देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी, राजेश राठोड, सुनिल मडावी, सतीश उपलेंचवार, कुंडलीक गिरमाजी, तुकाराम वारलवाड, गोविंद टोकरे, अंबादास कंचकटले, पुरुषोत्तम भोंगळे, भिमराव पवार, बालाजी माने यांचेसह तालुक्यातून विविध विभागांचे प्रमुख अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.