
पुणे शहरामध्ये गुन्हेगारांनकडून सर्वसामान्यांमध्ये दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडून अशा गुन्हेगारांना शिकवला चांगला धडा. त्यामध्ये प्रामुख्याने गाड्यांची तोडफोड, लूटमार, कोयता गॅग, मुलींची छेडछाड असे अनेक प्रकार पुणे शहरांमध्ये पाहायला मिळाले. त्यातीलच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कात्रज व भारत नगर भागामध्ये गाड्यांची तोडफोड करून सर्वसामान्यांमध्ये दहशत मजवणाऱ्या गुन्हेगारांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मार्फत ॲक्शन मोड घेत अशा गुन्हेगारांची धरपकड करून संबंधित विभागामध्ये धिंड काढत शक्तीची कारवाई करण्याचे सत्र जोरात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय साळगावकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय शेंडे सर, पी आय खिलारे सर, पी आय मोकाशी सर सहित भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन स्टाफ यांच्या माध्यमातून अशी फास्ट ॲक्शन मोड कारवाई करण्यात आली. व त्याचे संबंधित विभागातील सर्वसामान्यांकडून कौतुक करण्यात आले.





