
सुमिता शर्मा ;
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृह, जि.प. येथे (आशा) दिवस व जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला, विविध कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी संगिता भांगरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून एकात्म अभियानाचे अमर सिंग राठोड, सुष्मा सिंग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोमल मुनेश्वर, शितल राजापूरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश पडगीलवार, डॉ. प्रशांत चौधरी, विस्तार अधिकारी मुरलीधर नन्नावरे आदी उपस्थित होते.
वर्षभरात आशा स्वयंसेविका योजना व क्षयरोगाबाबत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. आरोग्याच्या रणरागिणी अहोरात्र आरोग्य विषयक कार्य करीत असतात, असे मान्यवरांनी आशा स्वयंसेविकांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमात एकात्म अभियानाचे समन्वयांमार्फत हार्टफुलनेस सत्र आयोजित करण्यात आले.
सदर कार्यक्रमात गित गायन, नृत्य, पथनाट्य असे विविध कलाकृती आशा स्वयंसेविकांनी सादर केली., तसेच क्षयरोग दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, निंबध स्पर्धा , चित्रकला, राष्ट्रीय क्षयरोग विषयावर एकपात्री अभिनय स्पर्धा घेण्यात आली. सर्व विजयी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक व विद्यार्थ्यांना भेट वस्तु देवून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कोमल मुनेश्वर यांनी केले. संचालन दीक्षा फुलझेले यांनी तर आभार आम्रपाली दुर्योधन यांनी मानले. यावेळी आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक स्त्रि/ पुरुष, आरोग्य सेविका, स्टॉफ नर्स व तालुका आरोग्य कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.के राठोड, सुरेश कुंभारे, डॉ. प्रियंका उपरे, जयांजली मेश्राम, खिरेंद्र पाझारे, संदीप मुन, प्रणल मुन तसेच कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.