
अहिल्यानगर : प्रतिनिधी राविराज शिंदे
ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सतर्क आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली.
आले. शिर्डीची विमानसेवा गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मंदिर परिसरातील सुरक्षेची पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचे जिल्ह्यावर काय परिणाम होतील, यासाठीच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी पंकज अशिया यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, खबरदारी म्हणून प्रशासकीय
ऑपरेशन सिंदूरनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल करण्यात
यंत्रणा सतर्क असल्याचे ते म्हणाले.
पुणे-झेलम (जम्मूतावी) ही एक्स्प्रेस रेल्वे युद्धाच्या पार्श्वभूमीवर रद्द झाल्याची अफवा पसरली होती. अहिल्यानगर रेल्वे स्टेशन मास्टर यांच्याकडून माहिती घेतली असता, झेलम रात्री आठ वाजता नियमित वेळेनुसार नगरमधून जम्मूकडे रवाना झाल्याची माहिती त्यांनी दिली. झेलम एक्स्प्रेस दररोज पुण्याहून निघून अहिल्यानगर-मनमाडमार्गे जम्मूकडे जाते.