

गुजरवाडी रोड परिसरातील दत्तनगरमध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर असून, येथील नागरिक हे प्रामुख्याने मध्यम व गरीब वर्गातील आहेत. महिलांकडून गॅससदृश उपकरणांचे हाताळणं मोठ्या प्रमाणावर केलं जातं. त्यामुळे एलपीजी गॅस कसा सुरक्षितपणे वापरावा, गॅस गळती झाल्यास सुरुवातीला कोणती खबरदारी घ्यावी, छोट्या चुकीतून मोठी दुर्घटना कशी टाळता येईल, अशा विषयांवर सखोल माहिती या जनजागृती मोहिमेत देण्यात आली.
यामध्ये अग्निशमन दल (भारती विद्यापीठ, कात्रज विभाग) चे STO विजय भिलारे, प्रदीप खेडेकर आणि त्यांची टीम यांनी फायर अँड सेफ्टी संबंधी प्रात्यक्षिकं सादर केली. कांचन गॅस एजन्सी आणि उमा शिव भारत गॅस एजन्सी कात्रज यांनीही या उपक्रमाला सहकार्य दिलं.
अखिल दत्तनगर मित्र मंडळ यांचाही सक्रिय सहभाग यामध्ये होता.
या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उस्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांकडून अशा प्रकारचे उपक्रम भविष्यात पुन्हा पुन्हा राबवावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
हा उपक्रम एलपीजी गॅस सुरक्षेविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी आणि संभाव्य दुर्घटनांपासून बचाव करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल अग्निशामक दल, कंचन गॅस तसेच उमाशिव गॅस एजन्सीच्या मॅनेजमेंटचाही पुष्प व श्रीफळ देऊन मानसन्मान स्थानिकांच्या वतीने करण्यात आला.