A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

माउंट कार्मेल कॉन्व्हेंट घुग्घूस व आयडीयल स्कूल बल्लरपूर कडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

वट पौर्णिमा निमित्त्य जिल्हाधिकारी चे आदेश असताना शाळेला सुट्टी नाही

समीर वानखेडे:
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील माउंट कारमेल कॉन्व्हेंट स्कूल या शाळेने माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशाची अवहेलना करून विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत बोलविले.
माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी वटसावित्री निमित्त कलेक्टर हॉलिडे ची सुट्टी जाहीर केली असतानाही माउंट कार्मेल कॉन्व्हेंट च्या प्रिन्सिपल ने माननीय कलेक्टर च्या आदेशाची अवहेलना केली व हिंदू महिलांच्या पवित्र वटसावित्रीच्या सणाचा सुद्धा अवमान केला.
वटसावित्रीचा सण हिंदू महिलांसाठी सौभाग्याचा सण असून प्रत्येक महिला वडाच्या झाडाची पूजा करायसाठी जात असते. माउंट कारमेल कॉन्व्हेंट स्कूल मध्ये 90% महिला कर्मचारी असून त्या बहुतांशी हिंदू आहेत. त्यांना सुट्टीच्या दिवशी बोलून सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत शाळेत ठेवणे व विद्यार्थ्यांनाही एवढ्या उन्हात उन्हाळ्या सुट्ट्या सुरू असताना बोलवणे हे शासनाच्या आदेशाचा अवमान व मानवतेच्या विरुद्ध आहे, तसेच हिंदू धर्माच्या धार्मिक भावना दुखावणारा आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूलचे अध्यक्ष विवेक आंबेकर यांनी यासंदर्भात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून याबद्दल तक्रार केली तसेच चंद्रपूर विधानसभेचे माननीय आमदार श्री किशोर भाऊ जोरगेवार यांच्या माध्यमातून माननीय जिल्हा परिषद कार्यकारी अध्यक्ष यांना सुद्धा शासनाचे आदेशाचे अवहेलनाबद्दल सांगितले. माननीय जिल्हाधिकाऱ्यां च्या व शासनाच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या शाळेची चौकशी करून शाळेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूलचे अध्यक्ष श्री विवेक आंबेकर यांनी केली.
आयडीयल इंग्लिश स्कूल पण चालू
बल्लारपूर पेपर मिल कामगार संघटने द्वारे संचलित आयडीयल इंग्लिश स्कूल वट पौर्णिमा ला चालू असल्याचे आढळून आले येथे पण शिक्षक तथा कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते या शाळेतील मुख्याध्यापकाने सुद्धा मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसते .

Back to top button
error: Content is protected !!