
प्रेस विज्ञप्ति
वर्षा निवासस्थान, मुंबई
महाराष्ट्राच्या भूमीला सहकार क्षेत्राचा 120 वर्षांचा समृद्ध इतिहास!
सहकार क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे आणि भविष्यातही राहील!
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे, आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने ‘सहकार से समृद्धि 2025’ या राष्ट्रीय परिसंवादाचे उदघाटन संपन्न झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, सहकार क्षेत्राचा 120 वर्षांचा समृद्ध इतिहास लाभलेली महाराष्ट्राची भूमी, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची ठरते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्राची ताकद ओळखून देशात प्रथमच स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले. या निर्णयावर ‘सोने पे सुहागा’ म्हणजेच या मंत्रालयाची धुरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उत्तम प्रशासक असून सहकार क्षेत्रात सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती या विविध क्षेत्रात सक्रियपणे काम करतात. यामुळे सहकार क्षेत्रात गुंतवणूक वाढली असून, सहकार क्षेत्राच्या विविध योजना गावागावात प्रभावीपणे पोहोचल्यामुळे सहकाराचे नवीन स्वरूप आपल्याला पाहायला मिळत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात सहकार क्षेत्राच्या कामामुळे शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यातील अंतर कमी झाले आहे. याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु आहे. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिला असून भविष्यातदेखील अग्रेसर राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
वेगवेगळ्या पिकांच्या खरेदीमध्ये नाफेडचे काम उत्तम असून, खरेदीच्यावेळी आवश्यक त्या साहित्याची पुरेशा प्रमाणात उपलब्धता असावी याची काळजी आधीपासूनच नाफेडने घ्यावी, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवर तात्काळ सकारात्मक उत्तर देत गृह व सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, आता याची सुरुवात करण्यात आली असून मका आणि सर्व डाळींची नाफेडच्या ॲपवर शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास त्यांचा शेतमाल नाफेड 100% हमीभावाने खरेदी करेल. तसेच बाजारात दर जास्त असेल तर शेतकरी आपली डाळ बाजारातदेखील विकू शकतो अशी योजना तयार करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवर गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या सकारात्मक भूमिकेचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री बाबासाहेब पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
Vande Bharat live tv news,Nagpur
Editor
Indian council of Press,Nagpur
Journalist
Contact no.9422428110/9146095536
HEAD OFFICE Plot no.18/19,Flat
no.201,Harmony emporise Payal -
pallavi society new Manish Nagar-
Somalwada-440015









