A2Z सभी खबर सभी जिले की
Trending

*वारकऱ्यांना अर्बन नक्षलवादी म्हणणाऱ्या, वारीला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो !*

*वारकऱ्यांना अर्बन नक्षलवादी म्हणणाऱ्या, वारीला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो !*

             प्रेस विज्ञप्ति 
     ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’
           विधान भवन, मुंबई 

वारकऱ्यांना अर्बन नक्षलवादी म्हणणाऱ्या, वारीला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो !

विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं महायुती सरकार आल्यापासून समोर आणली. पण सत्ताधारी पक्ष त्या सर्व प्रकरणांवर मूग गिळून गप्प बसला आहे जणू काही ह्या भ्रष्टाचाराला सरकारची मूकसंमती आहे की काय असं आता वाटायला लागलं आहे. तसंच आता ह्या महायुतीने गलिच्छ राजकारणाचा कळस गाठला आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या वारीला जिथून संत परंपरेचा, मानवतेचा, समानतेचा विचार जगभर जातो त्या वारीत अर्बन नक्षल आहेत असं म्हणण्यापर्यंत महायुतीची मजल गेली आहे. हे संताप जनक नाही का? म्हणून आज अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी ‘मंत्र्यांचे पुत्रप्रेम, जमीनी बळकावण्याचा सुरूय गेम’, ‘घोटाळेबाज सरकारचा धिक्कार असो’ असे फलक हातात घेऊन तर ‘वारकऱ्यांना अर्बन नक्षलवादी म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो’ अशा घोषणांसह महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

यावेळी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचे माननीय विधिमंडळ गटनेते व आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, ‘काँग्रेस’चे माननीय आमदार विजय वडेट्टीवार, ‘काँग्रेस’चे विधान परिषदेचे माननीय आमदार श्री. सतेज पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय श्री. अंबादास दानवे, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे माननीय आमदार श्री. अजय चौधरी, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे विधान परिषदेचे माननीय आमदार श्री. सचिन अहिर यांच्यासह महाविकास आघाडीचे इतरही आमदार उपस्थित होते.

Vande bharat live tv news,nagpur 
             Editor 
 Indian Council of press,Nagpur
           Journalist

Contact no.9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur – 440015

Back to top button
error: Content is protected !!