
सिडको/नाशिक, प्रतिनिधी-अनिकेत मशिदकर: संघर्ष योद्धा मा. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा ५ दिवस असून त्यांची त्यबेत खालावत असून नविन नाशिक मधील सकल मराठा समाजाच्या वतीने त्रिमूर्ती चौक येथील शिवनेरी फार्मा या ठिकाणी १ दिवसाचे लाक्षणिक उपोषण तसेच बोंबाबोंब आंदोलन करण्यास सूरवात करण्यात आली आहे
या वेळी आशिष हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, “येत्या दिवसात जर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारने मागण्या मान्य नाही केल्यात किंवा त्यांच्या त्यबेतीला काही बरे वाईट झाले, तर नविन नाशिक सकल मराठा समाजाकडून मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल याची सर्व जबाबदारी ही सरकारची असेल.”
या ठिकाणी आंदोलनाला नविन नाशिक सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अमोल पाटील, संजय भामरे, विजय पाटील, पवन मटाले, योगेश गांगुर्डे, हर्षल चव्हाण, राम पाटील,जितेंद्र पाटिल, योगेश पाटील, गोपी पगार, विशाल पगार, गौरव भदाने, हर्षद पाटिल, शुभम महाले, राहुल काकळीज, योगेश आहीरे, हरीश शेवाळे आदींसह मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.