A2Z सभी खबर सभी जिले कीTechnologyअन्य खबरेमहाराष्ट्र

जी. एच. रायसोनी स्मृती चंद्रपूर डिस्ट्रिक्ट स्पर्धा २०२५ चा बक्षीस वितरण सोहळा थाटात संपन्न.

संजय पारधी चंद्रपूर
चंद्रपूर : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या अधिपत्याखाली चंद्रपूर बॅडमिंटन डेव्हलोपमेंट असोसिएशन चंद्रपूर अंतर्गत जी. एच. रायसोनी स्मृती चंद्रपूर डिस्ट्रिक्ट स्पर्धा २०२५ चा बक्षीस वितरण सोहळा दि. ६ जुलै २०२५ रोजी बॅडमिंटन हॉल , डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स , सिविल लाईन्स , चंद्रपूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. मुंमक्का सुदर्शन होते. तसेच अतिथींमध्ये मा. श्री. ईश्वर खरकडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, चंद्रपूर , श्री. ईश्वर उईके , तालुका क्रीडा अधिकारी , श्री. रोशन चड्ढा , चड्ढा ट्रान्सपोर्ट होते. तसेच चंद्रपूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन डेव्हलोपमेंट असोसिएशन चंद्रपूर चे अध्यक्ष श्री. गिरीश चांडक , सचिव श्री. जोवेल चांदेकर CDBDA, श्री. वीरेंद्र जैस्वाल , सहसचिव, CDBDA, श्री. लक्ष्मीकांत आरके , कोषाध्यक्ष, CDBDA, श्री. एस.एच.थेमस्कर , श्री. विनोद मोडक , श्री. पराग धनकर या प्रसंगी उपस्थित होते.
CDBDA अध्यक्ष श्री. गिरीश चांडक यांच्या हस्ते अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या 3 दिवसीय स्पर्धेमध्ये 325 खेळाडू आले होते. 390 एन्ट्रीज झाले होते. एकूण स्पर्धेमध्ये 360 मॅचेस खेळले गेले . तसेच 32 इव्हेंट्स आणि 4 बॅडमिंटन कोर्ट होते. या स्पर्धेमध्ये मुले , मुली, पुरुष, महिला , प्रौढ पुरुष यांचे ९ वर्षांपासून तर ६० वर्षापर्यंत सामने घेण्यात आले होते. प्रास्ताविक भाषणात श्री. गिरीश चांडक यांनी मा. पोलीस अधीक्षकांचे व उपस्थित मान्यवरांचे धन्यवाद दिले. सोबतच विजयी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच हि स्पर्धा चयन स्पर्धा होती. या स्पर्धेमधून टीमचे चयन करून त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेता येईल असेही म्हटले.
कार्यक्रमाचे संचालन कु. शगुन पोचमपल्लीवार तर आभार प्रदर्शन श्री. जोवेल चांदेकर यांनी केले होते.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे आहे.
मुले अंडर ९ मध्ये विनर रुद्राक्ष अग्रवाल तर रनर मध्ये स्वामी जुमनाके मुली अंडर ९ मध्ये विनर कु. नायसा लोढिया तर रनर मध्ये हार्वी उपरे
मुले अंडर ११ मध्ये विनर साई तुराणकर तर रनर मध्ये परीक्षित धात्रक मुली अंडर ११ मध्ये विनर कु.मृगजा गुलाने तर रनर मध्ये रिद्धी धकाते
मुले अंडर १३ मध्ये विनर कश्यप वानखेडे तर रनर मध्ये साई तुराणकर मुली अंडर १३ मध्ये विनर कु. अशनीर साहनी तर रनर मध्ये कु.मृगजा गुलाने
मुले अंडर १५ मध्ये विनर यूहान अग्रवाल तर रनर मध्ये वेद धकाते मुली अंडर १५ मध्ये विनर पलक यादव तर रनर मध्ये दृष्टी राणे मुले अंडर १७ मध्ये विनर सुशील निखाते तर रनर मध्ये प्रचित मोडक
मुली अंडर १७ मध्ये विनर पलक यादव तर रनर मध्ये योषिका वाघमारे मुले अंडर १९ मध्ये विनर स्पर्श हिंगे तर रनर मध्ये वेदांत वाढई
मुली अंडर १९ मध्ये विनर पलक यादव तर रनर मध्ये कु.संहिता धनकर पुरुष एकेरी मध्ये विनर स्पर्श हिंगे तर रनर मध्ये ओम वरभे महिला एकेरी मध्ये विनर भविष्या सूचक तर रनर मध्ये आर्या ढवळे
महिला ३०+ एकेरी मध्ये विनर चैताली वाघमारे तर रनर मध्ये डॉ. प्राची डुमणे पुरुष ३०+ एकेरी मध्ये विनर प्रकाश सातपैसे तर रनर मध्ये महेंद्र वानखेडे
पुरुष ४५+ एकेरी मध्ये विनर मनतोस देबनाथ तर रनर मध्ये अशोक उईके पुरुष ६०+ एकेरी मध्ये विनर सुभाष तुम्मेवार तर रनर मध्ये डॉ. नवल राठी बॉईज अंडर १३ डबल्स मध्ये विनर रियांश चहारे आणि वंदिक पेठे तर रनर मध्ये साई तुराणकर आणि योगराज बोधे बॉईज अंडर १७ डबल्स मध्ये विनर लोकदिप घुटके आणि साहिल निखाडे रनर मध्ये प्रचित मोडक आणि यूहान अग्रवाल
गर्ल्स अंडर १९ डबल्स मध्ये विनर गार्गी पिसे आणि गार्गी खाडे तर रनर मध्ये भविष्य सूचक आणि प्रचिती मोडक वूमेन्स डबल्स मध्ये विनर आर्या ढवळे आणि मल्लिका कावळे तर रनर मध्ये अश्विनी ढेंगळे आणि सरिता पिंपळकर मेन्स डबल्स मध्ये विनर प्रेम वर्मा आणि यश चितोवार तर रनर मध्ये अंजेश कावळे आणि आदित्य कन्नमवार ३५+ डबल्स मध्ये विनर मुंमक्का सुदर्शन आणि प्रकाश सातपैसे तर रनर मध्ये महेंद्र वानखेडे आणि विजय अग्रवाल ४५+ डबल्स मध्ये विनर अशोक उईके आणि भागचंद डोडानी तर रनर मध्ये विनोद मोडक आणि अनिस राजा ६०+ डबल्स मध्ये विनर रोशन चड्ढा आणि नवल राठी तर रनर मध्ये जोवेल चांदेकर आणि सुभाष तुम्मेवार

Back to top button
error: Content is protected !!