A2Z सभी खबर सभी जिले कीमहाराष्ट्र

शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवस व इतर वैयक्तिक कार्यक्रम न साजरे करण्याबाबत आदेश – दीपक पाचपुते यांच्या मागणीला प्रतिसाद

शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवस व इतर वैयक्तिक कार्यक्रम न साजरे करण्याबाबत आदेश – दीपक पाचपुते यांच्या मागणीला प्रतिसाद

दिनांक: १९ जुलै २०२५
🔹 अहिल्यानगर रविराज शिंदे (प्रतिनिधी) – सजग नागरिक व ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरी समूहाचे जिल्हाध्यक्ष दीपक पाचपुते यांनी केलेल्या लेखी मागणीच्या अनुषंगाने, जिल्हा परिषद अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत कोणतेही वाढदिवस, वैयक्तिक कार्यक्रम किंवा सामाजिक उत्सव साजरे करू नयेत, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.

🔹 दीपक पाचपुते यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले होते की, शासकीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळ व संसाधनांचा अपव्यय करून केक कापणे, हारतुरे, सजावट, फोटोशूट व सामूहिक खाणेपिणे अशा स्वरूपाचे कार्यक्रम शासकीय शिस्तभंगासारखे आहेत. हे वर्तन महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६९ व शासकीय आचारसंहितेच्या विरोधात आहे, असेही त्यांनी नमूद केले होते.

🔹 जिल्हा परिषद सीईओ यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत संबंधित सर्व विभागांना लेखी आदेश काढून स्पष्ट निर्देश दिले की, अशा कार्यक्रमांमुळे कार्यालयीन वेळ व शासकीय कामात अडथळा निर्माण होतो आणि प्रशासनाची प्रतिमा धूमळते.

🔹 आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

🔸 दीपक पाचपुते यांच्या जनहित याचिकेप्रमाणे मिळालेला प्रतिसाद हा प्रशासनातील शिस्त व पारदर्शकतेच्या दृष्टीने स्वागतार्ह पाऊल आहे, असे नागरिकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.

Back to top button
error: Content is protected !!